Home > Political > ''लोकांना ज्ञान देत फिरतां जरा मतदारसंघात लक्ष द्या'' भास्कर जाधवा यांच्यावर चित्रा वाघ भडकल्या...

''लोकांना ज्ञान देत फिरतां जरा मतदारसंघात लक्ष द्या'' भास्कर जाधवा यांच्यावर चित्रा वाघ भडकल्या...

लोकांना ज्ञान देत फिरतां जरा मतदारसंघात लक्ष द्या भास्कर जाधवा यांच्यावर चित्रा वाघ भडकल्या...
X

भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कोकणाचा दौरा केल. या दरम्यान त्यांनी कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ या थेट भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यात असलेल्या मिर्ले गावात जाऊन धडकल्या. येथील सगळी सत्तास्थाने शिवसेनेकडे आहेत. खासदार राष्ट्रवादीचे आहेत. राज्यात आघाडी सरकार असताना ही अवस्था मिर्ले धनगरवाडी रस्त्याची? असा सवाल वाघ यांनी भास्कर जाधवांना विचारला आहे. काळजी करू नका आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करू, भांडू जाब विचारू व तुम्हाला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही वाघ यांनी ग्रामस्थांना दिली आहे. आमचे धोंडू गोरे, अनिकेत कानडे यासाठी पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

इकडे मुंबईत येऊन नेहमी तोंडाची वाफ घालवत भाजप विरोधात जोर लावत असता. पण तोच जोर तुमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी लावा. लहान मुलांना पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत जाता येईल याची व्यवस्था करा, असा सल्ला त्यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे कायम आदिवासी धनगरवाड्या वस्त्यांकडे लक्ष देतात. त्यांच्या कामाचे स्वागत आहे. त्याच आदित्य ठाकरेंनी आता त्यांचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या मतदारसंघातील धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे. भयग्रस्त भागांतून डोंगर दऱ्यातून वाट काढत शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सुरक्षितपणे जाता येईल हे पहावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

भास्कर जाधव आमदार आहेत, त्या गुहागर मतदारसंघात येत असलेल्या खेड तालुक्यातील मिर्ले गावच्या धनगरवाडीकडे जाणारा साधा रस्ताही यांना करता येत नाही काय, ही अवस्था आहे? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे. बरं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमचाच मुलगा, शिवसेनेचे आमदार तुम्हीच. जिल्हा परिषद यांच्याकडे. तरीही छोटी लेकरं आया, वृद्ध आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करत रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, ही दुर्देवी अवस्था आहे, असं वाघ म्हणाल्या.

Updated : 31 May 2022 2:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top