"अकेला देवेंद्र क्या करेगा"असं विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर म्हणजे आजचा विजय - चित्रा वाघ
X
राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले.आणि शिवसेनेला एका जागेवर पराभवाचं तोंड पाहवं लागलं. त्यामुळे भाजपचे बरेचसे नेते आता शिवसेनेवर टीका करून तोंड सुख घेत आहेत. अशात भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ कशा मागे राहतील. त्यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असं विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर आमच्या या विजयाने मिळाले आहे अशी प्रतिक्रीया पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रघुनाथ कुचिक प्रकरण जे भाजप नेत्या चित्रा वाघ हाताळत होत्या ज्यात पिडीतेने उलट त्यांच्यावरच काही काळापुर्वी आरोप केले होते. त्याच रघुनाथ कुचिक प्रकरणात आता नव्या अपडेट्स आल्या आहेत त्याचसंदर्भात भाजप महिला अध्यक्ष आणि राज्य कार्यकारीणीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्वात आधी या प्रकरणाबाबत माहिती दिली.
मध्यंतरीच्या काळात रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात पिडीतेसोबत आम्हीच होतो. तिला न्याय देण्याच आम्ही पुरेपूर प्रयत्न करत होतो. पिडीतेने माझ्यावर आरोप करेपर्यंत राज्यातील कोणतंही महिला नेतृत्व समोर आलं नाही. जेव्हा तिने माझ्यावर आरोप केले त्यानंतर तिच्या मदतीला संपूर्ण राज्यातील महिला नेत्या धावुन आल्या. मग त्या इतके दिवस गप्प का होत्या. अर्थात आम्ही तिच्या सोबत होतो आहोत आणि राहू… तिने माझ्यावर का आरोप केले कुणाच्या दबावाखातर केले हे देखील समोर येउन तिनेच सांगितलं आहे त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखीन पुरावे कुचिक यांच्या विरोधात सापडले आहेत. तसं पत्रच मला शिवाजी नगर पोलिसांकडून मिळालं आहे त्यामुळे रघुनाथ कुचिकचा जामीन रद्द व्हावा यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज करणार आहोत असं त्या म्हणाल्या.
मुंबई पोलीसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी लागेल असा नावा आदेश काढला आहे. या आदेशावरही टीका करत चित्रा वाघ यांनी हा तुघलकी आदेश असल्याचं म्हटलं आहे. शिवाय असा आदेश काढण्याचे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तांना आहेत का , कारण हा कायदा संसदेने संमत केला आहे. पोस्कोचे गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी काढलेली ही पळवाट आहे का? मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाला राष्ट्रीय बालहक्क आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून आता स्पष्टीकरण मागवले आहे.
या शिवाय राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या आजचा विजय हा शानदार जबरदस्त जिंदाबाद होता. अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर म्हणजे आमचा आजचा हा विजय आहे. असं त्या या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.