Home > MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
Max Woman | 8 May 2020 2:47 PM IST
X
X
भाजप ची विधानपरिषदेची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पंकजा मुंडे यांना तिकिट नाकारण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात पंकजा यांना तिकिट मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पंकजा मुंडे यांचा या यादीत समावेश नाही. तसंच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील विधानपरिषदेची उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांचा ही नेहमी प्रमाणे पत्ता कट करण्यात आला आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, तावडे यांचा देखील भाजपने पत्ता कट केला आहे.
हे ही वाचा...
- MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
- पंकजा मुंडे नंतर भाजपाच्या व्यासपीठावरून महिला गायब
- 'य़ा' कारणामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव
आय्यारामांसोबत नवीन चेहऱ्यांना संधी…
वंचित बहुजन आघाडीला रामराम करुन विधानसभेच्या निव़डणूकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढलेले गोपिचंद पडळकर यांना भाजपने संधी दिली आहे.
त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे माढा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार निवडून आणि माळशिरस मध्ये पक्षाचा आमदार निवडून आणणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आहे.
(भाजपकडून विधानपरिषदेच्या 4 उमेदवारांची घोषणा)
इतर दोन उमेदवारांमध्ये नागपूर चे माजी महापौर प्रविण दटके यांचा समावेश आहे. तर नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे या विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. त्या संदर्भात कागदपत्रांची जमवाजमव सुरु करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
‘कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधना मुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहे. माझ्या ई-मेल वरून माझ्या pa ने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी viral केलं. बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे.’
असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानपरिषेतील 9 जागांसाठी येत्या 21 मे ला मतदान होणार आहे. या लढतीत भाजपचा ३ ते ४ जागांवर विजय निश्चित मानला जात आहे.
विधानसभा निवडणूकीतील दारुण पराभवानंतर पंकजा यांनी भाजप कोअर कमिटीतीतील पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यानच्या काळात गोपीनाथ गडावरील सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्या वर तोफ डागली होती.
सोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह वाढलेली जवळीक त्यांना धोक्याची ठरली का? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे य़ांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करताना पंकजा यांना विधानपरिषदेचं तिकिट देण्याचं आश्वासन दिलं होतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
- हे ही वाचा...
Updated : 8 May 2020 2:47 PM IST
Tags: ajit gopchade bjp gopichand padalkar mlc election PANKAJA MUNDE pravin datake ranjeet singh mohite patil गोपीचंद पडळकर डॉ. गोपचडे पंकजा मुंडे प्रविण दटके रणजीतसिंह मोहिते पाटील विधानपरिषद
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire