Home > Political > बिहार विधानसभेत राडा : साडी सुटली तरी पोलीसांनी महिला आमदाराला फरफटत काढलं बाहेर

बिहार विधानसभेत राडा : साडी सुटली तरी पोलीसांनी महिला आमदाराला फरफटत काढलं बाहेर

"निहत्थी महिला विधायकों की इज्जत तार-तार होने पर क्या निर्लज्ज नीतीश कुमार को नींद आयेगी?" माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संतप्त सवाल

बिहार विधानसभेत राडा : साडी सुटली तरी पोलीसांनी महिला आमदाराला फरफटत काढलं बाहेर
X

देशात सध्या बिहार विधान सभेतील राडा चर्चेचा विषय बनला आहे. विरोधक आमदार विरुध्द पोलीस राड्यातील फोटो व्हिडीओ माध्यमांतून प्रसिध्द झाले. असाच एक व्हिडीओ बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडीओ बिहारच्या माजी मंत्री आमदार अनिता देवी यांचा आहे. व्हिडीओत सुरक्षा रक्षक त्यांना फरफटत नेत असल्याचं दिसून येत. याच दरम्यान त्यांची साडी सुटली पण तरिही महिला पोलीस त्यांना उचलत असल्याचं यात दिसतं.

दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी ट्वीट करत "माजी मंत्री आणि आमच्या आमदार अनिता देवी यांना निर्लज्ज नितीश सरकार फरफटवत आहे. याचवेळी त्यांची साडी सुटलेय. तुम्ही जी ठिणगी टाकलेय उद्या हीच ठिणगी तुमचे काळे कारनामे जाळून भस्म करेल. #नीतीशकुमार_शर्म_करो" असं म्हटलं आहे.

तर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राबडी देवी यांचं ट्वीट रिट्वीट करत "श्रीमती अनिता देवी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यांची साडी सुटल्यानंतरही प्रशासनाची निर्लज्जता कायम होती. एका निशस्त्र महिलेशी एवढ गैरवर्तन केल्यावर निर्लज्ज नितीश कुमार यांना झोप लागेल का? #नितीशकुमार_शर्म_कारो" असं म्हटलं आहे.


Updated : 24 March 2021 4:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top