Home > Political > उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी - मंत्री ठाकूर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी - मंत्री ठाकूर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची काहीही गरज नाही. माझी विनंती राहील की त्या वक्तव्याचा कोणी विपर्यास व इगो करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. काल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी - मंत्री ठाकूर
X

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची काहीही गरज नाही. माझी विनंती राहील की त्या वक्तव्याचा कोणी विपर्यास व इगो करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. काल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं.

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार असते तर चित्र काही वेगळं राहील असतं" असं वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री Adv. यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. काल अमरावती येथे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 वी पुण्यतिथी पार पडली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलत असताना मंत्री ठाकूर यांनी "शरद पवार साहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण आज काळाची गरज आहे, पवार साहेब आपल्या सोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. तुम्ही आमच्यासोबत उपस्थित आहात हे आमचं भाग्य आहे, छोटे मुँह बड़ी बात. पण साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र अजून काही राहिलं असतं." असं वक्तव्य केलं होतं.

काल घडलेल्या प्रकारानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..

मंत्री ठाकुर यांच्या या वक्तव्यामुळे काल दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता या सगळ्यावर मंञी ठाकूर यांनी "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे म्हणून महाविकास आघाडीत एकी आहे. निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या त्या वेळची आठवण मी फक्त करून दिली होती. माझी विनंती राहील, त्या वक्तव्याचा कोणी विपर्यास व इगो करू नये असं म्हंटल आहे.

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हंटल आहे?

मला असं वाटतं की, माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा राजकीय वकुब यांची महाराष्ट्राला नितांत आणि नेहमीच आवश्यकता राहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याला आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून ते हवेच आहेत.

किंबहुना सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची देखील हीच भूमिका असेल. यांचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब आम्हाला नको आहेत किंवा त्यांच्यावर टीका केली असा होत नाही. ज्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती, त्यावेळी अनेक तर्कवितर्क काढण्यात येत होते. मात्र त्यावेळेस मी हे म्हटलं होतं, या वाक्यांची मी कालच्या भाषणात आठवण करून दिली. बस्स एवढंच!

आणि तेवढाच त्याचा संदर्भ आणि अर्थ देखील आहे. या वाक्याचा वेगळा अर्थ काढून या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे भासवून राजकीय वाद निर्माण करण्यात विरोधकांना रस आहे. मात्र आम्ही कुणीही त्याला बळी पडणार नाही. असे छोटे मुद्दे उपस्थित करून महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी अभेद्य आहे. महत्वाचा मुद्दा असा की, आमचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून अतिशय कार्यक्षमपणे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम काम केले आहे आणि करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

सोबतच महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्हाला पितृतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या पवार साहेबांचे गुणगान करताना बोलल्या गेलेल्या शब्दांचा कुणी गैर अर्थ काढू नये, एवढंच प्रांजळपणे सांगते.

Updated : 11 April 2022 5:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top