Home > Political > अमृता फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांनाच टोला..

अमृता फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांनाच टोला..

अमृता फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांनाच टोला..
X

अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी काहीही वक्तव्य केलं तर पाहिला त्याची समाजमाध्यमांवर चर्चा होते आणि नंतर माध्यमांमध्ये.. अनेक वक्तव्यांवरून तर त्यांना नेटकऱ्यांच्या तुफान ट्रोलींगला सामोरे जावे लागते. पण त्या या कसल्याच गोष्टींचा विचार न करता राजकीय व सामाजिक विषयांवर आपलं मत नेहमीच व्यक्त करत असतात. आता अशाच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात ''जिनको आणा था वह आये नाही और जो आणे थे वह वैसे भी अणे वाले थे'' असं म्हणत थेट पती देवेंद्र फडणवीस यांचीच मजा घेतली आहे..

मुख्यमंत्री पदावर 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असं देवेंद्र फडणवीस यांनी मागे वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांना या वक्तव्यावरून किती ट्रोल केलं गेलं हे आपल्या सर्वांचं माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत त्यांचं याच मुख्यमंत्रीपदावरून बिनसलं आणि सर्व गणित बिघडलं. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न दुभंगले.. आता हे सर्व घडल्यानंतर मागच्या अडीच वर्षात फडणवीस महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. सरकार कधी पडणार याच्या वारंवार तारखा देण्यात आल्या आणि शेवटी महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्याच स्वपक्षात बंड केले व भाजपसोबत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. आता हे सर्व घडवून आणण्यात स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं एकनाथ शिंद यांनी सभागृहात सांगितले. राज्यात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन' हे वाक्य तुफान व्हायरल झाले. पण यावेळी देखील थोडा घोळ झाला आणि फडणवीस पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर उपमुख्यमंत्री म्हणून.. आता उपमुख्यमंत्री पद घेताना फडणवीसांची नाराजी त्यावेळी जे घडलं त्यावरून सर्वानाच दिसून आली. याचवरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जिनको आणा था वह आये नाही और जो अणे थे वह वैसे भी आणे वाले थे असं म्हणत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची मजा घेतली आहे.

या कार्यक्रमात काय घडलं..

तर अमृता फडणवीस नुकत्याच एका टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना निवेदकाने 'देर आये दुरुस्त आये' अशी एक पाटी दाखवली व त्यासंदर्भात बोलण्यास सांगितले. यावेळी त्यांनी जिनको आणा था वह आये नाही और जो आणे थे वह वैसे भी अणे वाले थे असं म्हणत उत्तर दिले आणि सेटवर एकच हशा पिकाला. आता अमृता फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याची सर्वत्र एकच चर्चा आहे...

या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व नुकत्याच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे साह्भागी झाल्या आहेत.

Updated : 13 Aug 2022 11:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top