Home > Political > "मी पुन्हा गाईन" अमृता फडणवीस ट्रोल

"मी पुन्हा गाईन" अमृता फडणवीस ट्रोल

मी पुन्हा गाईन अमृता फडणवीस ट्रोल
X

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांना देवंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून नाही तर त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी संपूर्ण देशभर ओळखलं जाऊ लागलं आहे. त्या एक गायिका आहेत. त्यांनी आजपर्यंत वेगवेगळी अनेक गाणी म्हंटली आहेत. त्यांच्या गाण्यांवरून त्यांना समाजमाध्यमांवर नेहमीच ट्रोल केलं जातं पण याचा कसलाच विचार न करता त्या आपली आवड कायम जोपासताना आपण पाहिलं आहे. आता बऱ्याच दिवसानंतर त्यांचं आणखीन एक गाणं येत आहेत. त्यांचं नवीन गाणं येणार असल्याचं त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना…. लफ़्ज़ नए है ,पर रंग वही सुहाना …… !

त्यांनी एक जुनेच गाणे नवीन अंदाजात म्हंटणार असल्याचं सांगितले आहे. 'प्यार का नगमा' हे जुने गाणे त्या पुन्हा नवीन अंदाजात म्हंटणार आहेत. आता त्यांनी नवीन गाणे येणार असल्याचं सांगितल्यानंतर त्यांना पुन्हा ट्विटर वर ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या या ट्विट वर अनेक कॉमेंट्स आल्या आहेत. Hrishikesh S Patil - INC या ट्विटर वापरकर्त्याने त्यांनी केलेल्या ट्विट ला उत्तर देत म्हंटले आहे कि, ओल्या दुष्काळात तेरावा महिना... "मी पुन्हा गाईन"

आता यांना नक्की काय म्हणायचं आहे माहित नाही पण असे अनेक लोक वारंवार त्यांना ट्रॉल करतात. आता अमृता फडणवीसांचा आवाज अनेकांना आवडत नाही. मात्र त्यांना गाण्याची आवड आहे त्यांनी गायलं तर लोकांना राग येण्याचं कारण काय आहे कोणास ठाऊक?

Yashwant(sumit) Mohod 0016 यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विट वर कॉमेंट करत म्हंटले आहे कि, मामी ना सूर, ना ताल, थोडं जपून..! उगाच ऍक्सिस बँकेचे शेयर कोसळणार तुमच्या या बिनकामाच्या उद्योगामुळे ..!

लोक अमृता फडणवीस याना नेहानी ट्रोल करतात याची करणे राजकीय हि असू शकतात कारण त्यांचे पती राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. अनेक वेळा त्यांच्यावर राजकीय द्वेषातून सुद्धा राग व्यक्त केला जातो. मात्र एखाद्या स्त्री विषयी बोलता आणि ते हि समाजमाध्यमांवर काही तारतम्य बाळगणे गरजेचं आहे.

आता अनेकांनी अमृता फडणवीस याना ट्रोल केलं असलं तरी काहींनी त्याची बाजू सुद्धा घेतली आहे. rahul j हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत कि, कोणी ऐकायला बळजबरी केली आहे का नसेल ऐकायचे तर नका ऐकू, जे कोणी फक्त फालतू chya comments करत आहेत त्यांनी एकदा स्वतः एखाद गाणं गावं तेव्हाचे रिप्लाय बघा काय असतील ते. 620 लाईक्स आणि 180 रिप्लाय याचातच positive response समजतो.

तर शिवसैनिक प्रसाद यांनी सुद्धा अमृता फडणवीस यांची बाजू घेत म्हंटल आहे कि, मी भाजपा विरोधी जरी असलो तरी अमृता वहिनी यांचं वागणं मला पटत.एकीकडे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि दुसरीकडे एका स्त्रीला ट्रोल करायचं हे पुरोगामी विचारक म्हणून माझ्या बुद्धी ला अजिबात पटत नाही. देवेंद्र जी यांचं पण कौतुक करावं वाटत त्यांना मनमोकळ करिअर निवडू देयला.

अशा अनेक कॉमेंट्स अमृता फडणवीस यांच्या पोस्ट वर आल्या आहेत. अनेकांनी त्यांची बाजू घेतली आहे तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आता ट्रोलकरणं ठीक आहे मात्र ते करत असताना एखाद्या स्त्री विषयी आपली भाषा काय असायला पाहिजे याच भान सर्वानी ठेवले पाहिजॆ.

Updated : 18 July 2022 8:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top