Home > Political > देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी

देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी

देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
X

15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यामुळे देशाच्या आझादी के अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मोदी सरकारने हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले होते. तसेच सरकारने सोशल मीडियाचा प्रोफाईल फोटोही तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आता या अभियानावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट नरेंद्र मोदी व अभिनेत्री कंगना रानौत वर टीका केली आहे. ''कंगना राणावत व खुद्द मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला मग आजादी का अमृत महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?'' असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र 13 ऑगस्टपुर्वीच देशातील नागरिकांनी या आपल्या सोशल मीडियाचे प्रोफाईल बदलवण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान .यावर आता अमोल मेटकरी यांनी ट्विट करत म्हणाले की.. तिरंगा ध्वजाचे कोट्यावधीचे कंत्राट घेणारी "रेऑन" कंपनी नेमक्या कोणाच्या मालकीची? या माध्यमातुन परत अदानी अंबानी श्रीमंत करण्याचा महोत्सव होत आहे का? असे सवाल मेटकरी यांनी उपस्थित केले तर कंगना राणावत व खुद्द मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला मग आजादी का अमृत महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?

Updated : 6 Aug 2022 1:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top