लोकप्रतिनिधी असावी तर अशी !
X
स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मागे असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा पाहायला मिळाला आहे. आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असूनही नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने एका नगरसेविकेने आपल्या प्रभागातील कचरा उचलून स्वतः मनपा आयुक्तांच्या दालनात आणून टाकला. प्रभाग क्र.९ मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यामुळे मोठ्या रोगराई, साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रभागातील नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला जाब विचारतात, त्यांना काय उत्तर देणार असा सवाल या नगरसेविकेने आयुक्तांना विचारला आहे. पंचफुला चव्हाण या प्रभाग क्र.९च्या नगरसेविका आहेत. स्वतः कचरा गोळा करत रिक्षात भरून तो कचरा थेट महापालिकेत आणून यातील कचरा मनपा आयुक्तांच्या दालनात आणून टाकल. कचरा गोळा करणाऱ्यांचे कंत्राट रद्द करून त्या बोगस कंत्राटदारावर कारवाईची मागणीही त्यांनी केलीये.
https://youtu.be/FdN6UCQLhjk