Home > Political > हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट - प्रीती शर्मा

हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट - प्रीती शर्मा

नारायण राणे यांना मंत्री करून त्यांची जण आशीर्वाद यात्रा काढणे व त्यानंतर मुख्यमंत्र्याबद्दल असे वादग्रस्त विधान करणे हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट असल्याची टीका आम आदमी पक्ष्याच्या नेत्या व प्रवक्त्या प्रीती शर्मा यांनी केली आहे.

हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट - प्रीती शर्मा
X

नारायण राणे यांना मंत्री करून त्यांची जण आशीर्वाद यात्रा काढणे व त्यानंतर मुख्यमंत्र्याबद्दल असे वादग्रस्त विधान करणे हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट असल्याची टीका आम आदमी पक्ष्याच्या नेत्या व प्रवक्त्या प्रीती शर्मा यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री Narayan Rane यांनी मुख्यमंत्री Uddhav Thackeray याच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काल दिवसभर गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आले. त्यांना रात्री उशीरापर्यंत महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर होईपर्यंत हा गोंधळ सुरू होता. या सगळ्या प्रकारावर आम आदमी पक्ष्याच्या नेत्या व प्रवक्त्या प्रीती शर्मा यांनी जे काही घडले या सगळ्याचे नियोजन आधीच ठरले होते. नारायण राणे यांना मंत्री करून त्यांची जण आशीर्वाद यात्रा काढणे व त्यानंतर मुख्यमंत्र्याबद्दल असे वादग्रस्त विधान करणे हा सर्व भारतीय जनता पक्षाचा कट असल्याची टीका त्यांनी केली आहे.

त्याच बरोबर त्यांनी, मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी सुद्धा नारायण राणे यांना अटक करून आमच्यात सुद्धा काय धमक आहे हे दाखवून दिले. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सांगत असतानाचा मंत्री Anil Parab यांचा व्हिडिओ समोर आला आहे. राणे यांच्यावर कारवाई करत अनिल परब यांनी अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा बदला घेत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. हे सगळे प्रकार होत आहेत पण राज्यातील सर्वसामान्य लोकांसाठी मात्र काहीच केले जाते नाही आहे. अजूनही सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सुरू करण्यात आलेल्या नाहीत, लोकांना कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना देखील राबवल्या जात नाहीत, लोकांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत या सगळ्या गोष्टी या प्रकारात बाजूला पडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे दोघेही फक्त BJP ला फायदा व्हावा यासाठी हे सर्व करत आल्याच देखील त्यांनी म्हंटले आहे.

Updated : 25 Aug 2021 4:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top