Home > Political > शिंदे व ठाकरेंपेक्षा आलीय भट्टची चर्चा...

शिंदे व ठाकरेंपेक्षा आलीय भट्टची चर्चा...

शिंदे व ठाकरेंपेक्षा आलीय भट्टची चर्चा...
X

सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाच्या विरोधात केलेल्या बंडाची मोठी चर्चा आहे. राज्यातील सरकार कोसळणार की टिकणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे. एकीकडे राज्यात या महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्या तरी सध्या चर्चा मात्र बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचीच आहे. आज आपण जर पाहिलं तर आज दिवसभरात आलिया भट्ट गुगल ट्रेनमध्ये नंबर 3 वरती आहे. आलिया भट्ट ही मागच्या काही महिन्यांपूर्वी तिने केलेल्या रणवीर कपूर सोबतच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तर आता आलिया भट्ट पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय आहे? तर याचं कारण आपल्याला आलिया भट्ट यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती पाहायला मिळतं.




बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. मागच्या काही महिन्यांपूर्वी या दोघांनीही लग्न केलं. त्यांच्या या शाही लग्नाची चर्चा भारतातच नाही तर जगभर झाली. त्यानंतर आता आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण असा आहे की, आलिया भट ने नुकतच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ती आई बनणार असल्याची बातमी दिली आहे.(Alia bhatta is pregnent) आलियाने हॉस्पिटल मधील रणबीर कपूर सोबतचे फोटो शेअर करत ''माझे बाळ लवकर येत आहे" असं कॅपशन दिलं आहे.

Updated : 27 Jun 2022 3:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top