Home > Political > अजित दादा? बाईने पाडलं बाईने.. । Ajit Pawar । Narayan Rane । Kasba, Chinchwad (Pune)

अजित दादा? बाईने पाडलं बाईने.. । Ajit Pawar । Narayan Rane । Kasba, Chinchwad (Pune)

अजित दादा? बाईने पाडलं बाईने.. । Ajit Pawar । Narayan Rane । Kasba, Chinchwad (Pune)
X

राज्यातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यात आता महिलांनी तर राजकारणात यावं की नाही अशी परिस्तिथी आहे. आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आजचे राजकारणी व्यस्त आहेत. राज्यातील नागरिक हजारो प्रश्नांनी ग्रस्त आहेत पण याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना एकाद्या महिलेकडून होणार पराभव कमीपणाचा वाटतो का? कारण कसाब पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान अजितपवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले लोक पुढे राजकारणात यशस्वी झाले नाहीत, हे सांगताना अजित पवार यांनी काही उदाहरणं दिली होती. छगन भुजबळ शिवसेनेतून १९ लोकांसह बाहेर पडले होते. त्यानंतर भुजबळ यांच्यासकट सगळं लोक पराभूत झाले. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. त्यांच्यासोबतचे पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले. स्वत: नारायण राणे दोनदा पडले. एकदा कोकणात, दुसऱ्यांदा मुंबईतील वांद्रे येथे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर नारायण राणे यांना एका बाईने पाडलं. दादा बाईने पडलं तर मग काय झालं? बरं आपल्या वडिलांना अजित पवार असं म्हणाले म्हणून निलेश राणे यांनी अजित पवार यांना वापरलेली भाषा तर पाहायलाच नको. अजित पवार काय की राणे काय सध्या गरज आहे राजकीय नेत्यांची पुरुषी मानसिकता बदलण्याची..


Updated : 3 March 2023 7:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top