अदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रीपद ?
X
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.२०१९ ची निवडणूक झाल्यापासून अनेक राजकीय भूकंप आपण राजकारणात पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. शिवसेना पक्षांनंतर आता राष्ट्रवादीसुद्धा फुटल्याचं आपल्याला दिसत आहे.अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनामध्ये उपस्थित झाले आहेत . अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.
यामध्ये ३०आमदार अजित पवारांसोबत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ९ राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद सुद्धा मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे. यामध्ये खासदार सुनील तटकरे यांची या शपथविधीला उपस्थिती दिसत आहे. त्याचबरोबर अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.