राऊतांच्या टीकेनंतर दीपाली सय्यद यांचे ट्विट...
X
शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी केलेल्या वक्तव्यावरून काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. दीपाली सय्यद यांनी शिंदे व ठाकरे हे येत्या दोन दिवसात भेटणार असल्याचं म्हंटल होतं. याच वक्तव्यावरून राऊत यांनी सय्यद यांना ''काळजीपुर्वक विधान करावीत, त्यांना हे अधिकार कोणी दिले. त्या काय शिवसेनेच्या नेत्या नाहीत.'' अशा शब्दात सुनावले होते. त्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी राऊत यांना ट्विट करत एक चांगलाच सल्ला दिला आहे.
काल शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार असल्याचं म्हंटल आहे. आणि हि भेट घडवून आणण्यास भाजपच्या नेत्यांनी मदत केली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हंटल आहे. खरतर ज्या दिवशी शिवसेनेत फूट पडली त्या दिवसापासून दीपाली सय्यद या शिंदे व ठाकरे एकत्र येण्यासाठी आग्रही राहिल्या आहेत. त्यांनी समाजमाध्यमांचा माध्यमातून अनेक वेळा शिंदे यांना परत येण्यासाठी विनवण्या देखील केल्या. या संदर्भाने त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची जाऊन भेट घेतली या भेटीचे फोटो शेअर करत त्यांनी मी शिंदे व ठाकरे यांच्यात मध्यस्थी करत असल्याचं सांगितले. या भेटीनंतर त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा फोटो समोर आले. म्हणजेच शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली असावी. त्यामुळे शिंदे व ठाकरे यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण काल त्यांनी केलेल्या ट्विट नंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच झापले आहे.
दीपाली सय्यद यांनी येत्या दोन दिवसात शिंदे व ठाकरे यांची भेट होणार असल्याचं म्हंटल होत त्यानंतर राऊत यांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावत म्हंटल आहे कि, "दीपाली सय्यद यांनी काळजीपुर्वक विधान करावीत, त्यांना हे अधिकार कोणी दिले. त्या काय शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील पण अशा प्रकारची विधानं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. या प्रकारची विधानं पक्षाचे कार्यकर्ते, नेते करू शकतात." असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी ट्विट करत संजय राऊत यांना म्हंटले आहे कि, मला शिवसेना नेत्या पद हे अनिल देसाईसाहेबांच्या आदेशाने,ते वैधकिअवैध यांवर चर्चा नको परंतु त्याबद्दल माननीय संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी हे स्पष्ट आहे. माझी भुमिका मध्यस्तीची असल्याने राऊत साहेबांनी मोठ्या मनाने माफ करून सन्मानाने आमदारांना चर्चेला बोलवावे मार्ग निघेल.
मला शिवसेना नेत्या पद हे अनिल देसाईसाहेबांच्या आदेशाने,ते वैधकिअवैध यांवर चर्चा नको परंतु त्याबद्दल माननीय संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी हे स्पष्ट आहे. माझी भुमिका मध्यस्तीची असल्याने राऊत साहेबांनी मोठ्या मनाने माफ करून सन्मानाने आमदारांना चर्चेला बोलवावे मार्ग निघेल.
— Deepali Sayed (@deepalisayed) July 18, 2022
दीपाली सय्यद यांनी काय पोस्ट केली होती?
दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर समाजमाध्यमांवर एक पोस्ट करत म्हंटल होत कि, येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थी करिता भाजप नेत्यांनी मदत केली याबद्दल धन्यवाद चर्चेच्या ठिकाणची प्रतीक्षा असेल..