''करून दाखवलं'' आदित्य ठाकरे यांचे ट्विट
X
मुसळधार पावसाने दरवर्षी मुंबईत रस्त्यांवर पाणी तुंबत असतं . यावर्षी मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत आहे .काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे .त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर दुसरीकडे दरवर्षी मुसळधार पाऊस पडू लागला कि हिंदमाता परिसरात तलाव सदृश्य वातावरण तयार होते . पण यावर्षी मात्र हिंदमाता परिसरात यावर्षी पाणी साचलंच नाही.याठिकाणची वाहतूकही सुरळीत चालू आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा सुखद धक्का आहे.
दरम्यान या भागातील पाण्याचा निचरा व्हावा आणि स्थानिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी मागील वर्षी मुंबई महापालिकेनं विशेष काम केलं होतं. याची आठवण करुन देत "करुन दाखवलं" या दोन शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची क्षमता 2.87 कोटी लिटर इतकी आहे. पपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. यंदाच्या पावसात भूमिगत टाक्यांचा फायदा दिसून आला आहे .
यांपैकी एका टाकीत ६० हजार क्युबिक मीटर असं एकूण १ लाख २ हजार ५०० क्बुबिक मीटर पाणी साठवलं जातं. यामुळं हिंदमाता परिसरात आता पाणी तुंबत नाही. इथली ही वर्षानुवर्षाची समस्या या महत्वाच्या प्रकल्पामुळं सोडवली गेली आहे.त्यामुळे महापालिकेच्या कामाला यश आल्याचं दिसून येत आहे.