धार्मिक स्थळं कोणाच्या मालकीची आहेत का?
X
देशातील धार्मिक स्थळं ही कोणाच्या मालकीची आहेत का? या धार्मिक स्थळांवर कोणा एका विशेष वर्गाची मक्तेदारी आहे का? असा प्रश्न काशी विश्वेश्वर मंदिरांच्या घोषणेनंतर उपस्थित होतोय़. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील मंदिर संस्थानांकडे असलेलं सोनं व्याजरुपाने ताब्यात घ्यावे. त्या सोन्याचा कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापर करावा अशी सूचना मोदी सरकारला केली होती. यावर राज्यभरातून त्यांना अनेक धार्मिक संघटनांचा रोष पत्करावा लागला आहे.
काशी विश्वेश्वर मंदिराने पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबावर मंदिर प्रवेशास आजीवन बंदी लादण्यात आली आहे. यावर भूमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई य़ांनी मंदिरांच्या मनमानी कारभारावर टीकांचा भडीमार केलाय. मंदिरात दानरुपाने येणारा पैसा भाविकांचा असतो कोणत्याही मंदिराच्या ट्रस्टचा नाही. मग तो संकटसमयी लोकांच्या भल्यासाठी वापरला तर काय गैर आहे. असा सवाल त्यांनी या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केलाय. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/545333926180338/?t=1