"प्रियंका गांधी सर्वात मोठ्या हिंदू त्याच भाजपचा वध करतील" - आचार्य प्रमोद कृष्णम
X
कॉंग्रेस हा सेक्युलर पक्ष आसल्याचं म्हटलं जातं पण कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी "प्रियंका गांधी सर्वात मोठ्या हिंदू त्याच भाजपचा वध करतील" असं म्हटल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
तब्बल ८० खासदार असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याला लोकसभेत जाण्याचे द्वार म्हटले जातं. या राज्याची जबाबदारी प्रियंका गांधी पार पाडत आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी यांना दुर्गेचा अवतार म्हटलं आहे.
प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असून त्यांच्याच हातून भाजपचा वध होणार असल्याचं वक्तव्य करत नव्या वादालाही तोंड फोडलं. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी प्रियंका गांधी या सर्वात मोठ्या हिंदू असल्याचं म्हटलं. तसंच त्या दुर्गा मातेचा अवतार असून मंदिरात दर्शन करणं, प्रायागमध्ये स्नान करणं, हातांमध्ये रुद्राक्ष घालणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार असल्याचंही ते म्हणाले.