राजकारणी सत्ताकारणात व्यस्त मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय?
X
शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा साखळी उपोषणाचा आज 25 वा दिवस आहे. मागील 25 दिवसांपासून त्या उपोषण करत आहेत मात्र त्यांच्याकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिलेलं नाही. अशी माहिती उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कर्मचारी महिलांनी दिली.
कोरोना संसर्ग काळापासून या कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात वैद्यकीय सफाई कर्मचारी म्हणून काम केले यावेळी आशा वीस जणांना कामावरती घेण्यात आले होते आता सर्वांना कामावरून काढण्यात आले होते. त्यानंतर दहा जणांना कामावर घेतले गेले मात्र अजूनही उरलेल्या दहा जणांना ठेकेदाराने यांना कामावर घेतले नाही. या सफाई कर्मचारी महिलांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी त्या गेल्या 25 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी उपोषण करणाऱ्या महिलांनी आज माध्यमांसमोर केली आहे.
Video लवकरच अपलोड केला जाईल ...