Home > मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 331 कोटी रुपये, पी एम केयर हिशोब देणार का?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 331 कोटी रुपये, पी एम केयर हिशोब देणार का?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 331 कोटी रुपये, पी एम केयर हिशोब देणार का?
X

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सर्व भाजप नेत्यांनी PM Cares Fund साठी आर्थिक हातभार लावण्याचं आवाहन केलं होतं. यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. PM Relief Fund असतानाही स्वतंत्र पी एम केयर फंडाची स्थापना करण्याची आवश्यकता नव्हती. राष्ट्रीय लेखापरिक्षण अहवालापासून त्याला वेगळं केल्यामुळे या फंडाच्या विश्वासाहर्तेवरही विरोधकांनी शंका व्यक्त केलीय.

हे ही वाचा...

राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM Relief Fund) आतापर्यंत ३३१.७० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या रकमेतून स्थलांतरीत मजूर आणि कामगारांसाठी ५४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. परंतू राज्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या एकूण रकमेची घोषणा करून राज्य सरकार केंद्रालाही जनतेकडून आलेल्या पैशांचा लेखाजोगा दाखवण्याची मागणी तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.

लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

काल (बुधवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २० लाख करोडच्या आर्थिक पॅकेजचं विश्लेषण करताना देशभरातील पीएम केयर फंडातून देण्यात येणाऱ्या निधीची माहिती दिली. प्रवासी मजूरांसाठी १००० करोड निधीची तरतूद केल्याची घोषणा केली. सोबतच २००० करोड रुपये ५० हजार वेंटीलेटर च्या खरेदीसाठी देण्यात येतील. १०० करोड रुपये कोरोना व्हायरसची लस बनवण्यासाठी दिले जातील. असे एकूण ३१०० करोड रुपये पी एम केयर फंडातून देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने पीएम केयर फंडातून मिळालेल्या निधीचा विनियोग कसा केला जातोय याची माहिती दिली असली तरीही आतापर्यंत फंडात किती रक्कम जमा झाली आहे हे मात्र स्पष्ट केलं नाही.

Updated : 14 May 2020 1:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top