Home > Political > लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपये, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपये, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपये, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
X

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत महायुतीचे नेतेही उपस्थित होते.

एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

१) लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती

२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये

३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी

४) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत

५) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन राज्यात

६) 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांच्या प्रशिक्षणाद्वारे 25 लाख रोजगार निर्मिती आणि 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये शिक्षण शुल्क देण्याचे वचन

७) राज्याच्या ग्रामीण भागात 45 हजार गावांमध्ये पांदण रस्ते बांधण्यात येणार आहेत

८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन

९) वीज बिलात 30% कपात

१०) सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांत 'व्हिजन महाराष्ट्र 2029' सादर करणार

Updated : 6 Nov 2024 11:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top