Home > photo stories > युध्दामुळे युक्रेनमध्येच अडकली भारताची ही 'सुन', मोदींकडे केली भारतात आणण्याची मागणी

युध्दामुळे युक्रेनमध्येच अडकली भारताची ही 'सुन', मोदींकडे केली भारतात आणण्याची मागणी

रशिया युक्रेन युध्दामुळे युक्रेनमध्ये अनेक नागरीक अडकले आहेत. त्यातील एक युक्रेनी महिलेचा पती भारतीय असून तो दिल्लीत राहतो. या महिलेला आता तिच्या सासरी भारतात यायचं आहे.

युध्दामुळे युक्रेनमध्येच अडकली भारताची ही सुन, मोदींकडे केली भारतात आणण्याची मागणी
X

Russia-Ukraine War Update:गेला महिनाभर युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचा अवाढव्य फौजफाटा असुनही युक्रेन काही हार मानायला तयार नाहीये. यादरम्यान मोठ्या संख्येने लोक युक्रेन सोडून इतरत्र आश्रय घेत आहेत. युक्रेनचे नागरिक युक्रेनला लागून असलेल्या देशांतील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये सातत्याने जात आहेत. काही दिवसांपूर्वी हजारो भारतीय विद्यार्थ्यांना देखील मिशन गंगा अंतर्गत वाचवण्यात आलं. दरम्यान, पोलंडच्या निर्वासितांच्या शिबिरात एक युक्रेनी महिला सापडली असून तिचा नवरा भारतीय आहे. ती सध्या गर्भवती आहे आणि तिला भारतात यायचं आहे.


माध्यमांनी वॉर्सा, पोलंडमधील अशाच निर्वासित शिबिराचा आढावा घेतला जिथे त्यांना अनेक लोक आढळले जे एकमेकांना उघडपणे मदत करताना दिसले. काही अन्न, काही राहण्यासाठी जागा, काही औषधे इतर मार्गाने मदत करत आहेत. या निर्वासित शिबिरात एक युक्रेनियन महिला भेटली जिचा नवरा भारतीय आहे आणि तो सध्या दिल्लीत आहे. ही महिला गरोदर असून माध्यमांच्या माध्यमातून ती भारत सरकारला दिल्लीत तिच्या पतीकडे पाठवण्याचं आवाहन केलं आहे.


युक्रेनियन महिलेचे भारतीय नागरिकाशी लग्न झाल्याचे फोटोही समोर आले आहेत. फोटोमध्ये एक भारतीय नागरिक युक्रेनियन महिलेला मंगळसूत्र घालताना दिसत आहे.


युक्रेनियन महिलेने भारतीय नागरिकाशी हिंदू परंपरेनुसार लग्न केले.


दुसऱ्या एका फोटोमध्ये भारतीय नागरिक आणि युक्रेनियन महिला हार घालताना दिसत आहेत. युक्रेनची महिला आणि भारतीय नागरिकाने लग्नाच्या वेळी अग्निफेरेही घेतले.

Updated : 19 March 2022 3:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top