हे हॉटेल केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इथे पाहुण्यांना चांदीच्या बेडवर रात्र घालवण्याची संधी मिळते. यासोबतच सोन्याच्या ताटात जेवण वाढलं जातं.
या हॉटेलची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बाथरूमचा नळही सोन्याने मढवला आहे. 'द राज पॅलेस' असे या हॉटेलचे नाव आहे. जे जयपूर, राजस्थान येथे आहे. हे आशियातील सर्वात महागडे हॉटेल मानले जाते.
या हॉटेलच्या खास दरबार स्वीटमध्ये रात्रभर राहण्यासाठी खोलीचे भाडे 18 लाख रुपये आहे. पाहुण्यांना खास पदार्थांनी सजवलेले सोन्याचे ताट दिले जाते
या हॉटेलमध्ये 78 आलिशान खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये संगमरवरी सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. राज पॅलेस हॉटेलला 2007 साली 'राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार' श्रेणीतील सर्वोत्कृष्ट हेरिटेज हॉटेलचा पुरस्कार मिळाला आहे.
या हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बोल बच्चन चित्रपटाचे शूटिंग केले आहे. याशिवाय अक्षय कुमारने या हॉटेलमध्ये 'भुलभुलैया'चे शूटिंग केले आहे. टीव्ही मालिका रतन का स्वयंवर आणि झाशी की रानीचे शूटिंगही याच हॉटेलमध्ये झाले आहे.