महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सरकारी इंधन कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ७३.५ रुपयांनी वाढ केली आहे.
या महिन्यात केवळ व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरांमध्येच वाढ झाली आहे.
१९ किलो व्यवसायिक सिलिंडरचे नवे दरमुंबईत ७२.५० रुपयांची वाढ, सिलिंडरचा दर १५७९.५० रुपयांवर
दिल्लीत ७३ रुपयांच्या वाढीनं सिलिंडरचा दर १६२३ रुपयांवर
कोलकात्यात ७२.५० रुपयांची वाढ; नवा दर १६२९ रुपये
घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.