देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपल्या हॅचबॅक कार सेलेरिओचा नवीन अवतार ‘ऑल न्यू सेलेरियो २०२१’ लाँच केला.

नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जेन नेक्स्ट के १० सी इंजिनसह बनवलेली ही पहिली कार आहे.
ही कार पाचवी जनरल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
कारमध्ये ९९८ सी सी के १० सी ३ सिलेंडर इंजिन आहे.
नवीन सेलेरिओ २०२१ कारमध्ये सात इंच टचस्क्रीन कन्सोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटण, ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे.
फायर रेड आणि स्पीडी ब्लू कलर पर्यायांसह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे आणि कॅफीन ब्राउनमध्ये खरेदी करायला मिळेल.
या कारची किंमत 4.99 लाखापासुन चालु होते.