Home > पर्सनॅलिटी > बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल..

बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल..

व्हॅलेंटाईन डेच्या सिझनला अनेक ‘सिंगले’ मौसम मस्ताना BF नसताना असे स्टेटस ठेवत असतात. तर पोरिंनो BF नाही म्हणून उगाच रडू नका. कारण आता तुम्हाला फिरवायला बॉयफ्रेंड देखील भाड्याने मिळणार आहे. तर पापाच्या परिंनो तुम्हाला जर हा भाड्याचा BF पाहिजे असल्यास प्रोसेस जाणून घ्या..

बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल..
X

लोकहो व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय त्या निमीत्ताने आपल्या आजुबाजूचे मित्र/मैत्रीणी त्यांचे प्लान बनवत असतात. आणि या कपलच्या घोळक्यात तुम्ही एकटेच 'सिंगले' असता. अशा वेळी या घोळक्यात पापाच्या परिचा मुडऑफ होवू नये म्हणून शकुल गुप्ता या तरुणाने 'बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल' ही संकल्पना आणली आहे.

शकुल गुप्ता या तरुणाने 'Boyfriend on Rent' अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहीली आहे. यात त्याने 'बॉयफ्रेंड रेंटवर घ्या iPhone 12 Pro फ्री मिळवा' अशी स्पेशल ऑफर देखील दिली आहे.

शकुल मागील तीन वर्षापासून हे काम करत असून आतापर्यंत त्याने 45 डेट्स केल्या आहेत.


Updated : 12 Feb 2021 9:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top