मेरी कोम यांच्याशी पंगा घेणारी निखत जरीन कोण आहे पाहा..
निखत जरीन या महिला बॉक्सरने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये एकमेव सुवर्ण पदक जिंकले. निखतणे अत्यंत कौतुकास्पद अशीच कामगिरी केली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की, निखतला बॉक्सिंग मध्ये करियर करायचेच नव्हते तर तिला अॅथलेटिक्समध्ये प्रचंड आवड होती.. पण तिच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आणि तिचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला. तर नक्की काय झालं होतं? आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता नक्की वाचा..
X
निखत जरीन ही भारतातील महिला बॉक्सिंगमध्ये ठसा उमटवणाऱ्या काही खेळाडूंपैकी एक आहे. जिने फार कमी वेळात इतकी मोठी भरारी घेतली आहे. निखतला अगदी लहानपणापासून खेळाची आवड होती. तिथून सुरू झालेला तिचा हा प्रवास काल झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप पर्यंत येऊन थांबलेला नाही. तिचे स्वप्न आणखीन मोठं आहे.
बॉक्सिंग म्हंटल की आपल्याला खूप पुरुष लोकांची नावे आठवतील. मग असा प्रश्न येतो की हा खेळ महिलांसाठी आहे की नाही? आता तुम्हीच सांगा तुम्हाला मेरी कॉम सोडलं तर कुठल्या महिला बॉक्ससरचे नाव माहीत आहे? नाही ना! पण आता या क्षेत्रात आणखीन एक तारा चमकत आहे. त्याच नाव आहे निखत जरीन. आता कालच्या तिच्या यशानंतर तिचे नाव तुम्हाला माहित झाले असेल पण निखतला महिला बॉक्सिंग मध्ये नाही तर अॅथलेटिक्समध्ये आवड होती. तिला तिचं करियर हे रनिंग मध्येच करायचं होतं. पण तिच्या आयुष्यात तिने एक असा अनुभव घेतला आणि तिने ठरवले की, नाही आपण का बॉक्सिंग खेळू शकत नाही? निखतच्या याच जिद्दीचे आता यशात रूपांतर झाले आहे. या पाठीमागे अफाट कष्ट आहेत. तुम्हाला सुद्धा तिचा प्रवास जाणून घ्यायचा आहे ना? तर पाहुयात निखतचा सुवर्णपदक विजयापर्यंतचा प्रवास कसा होता...
निजामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने वयाच्या १३ व्या वर्षी बॉक्सिंग खेळण्यास सुरुवात केली. पूर्वी तिला अॅथलेटिक्समध्ये रस होता. ती 100 मीटर आणि 200 मीटर धावायची. सुरुवातीला तिच्या मनात व्यावसायिक बॉक्सिंग खेळण्यासारखे विचार नव्हता. पण एखादा काय झालं तर आठवीत शिकणारी निखत ही निजामाबाद येथील कलेक्टर ग्राऊंडवर होणाऱ्या अर्बन गेम्स खेळण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिने पाहिलं सर्व खेळात मुली होत्या, पण बॉक्सिंगमध्ये एकही महिला खेळाडू नव्हती. हे असं चित्र दिसल्यानंतर अस्वस्थ झालेल्या निखत ने तिच्या वडिलांना विचारले की, या खेळात मुली का नाहीत? वडिलांनी उत्तर दिले, 'कदाचित मुलींना मारहाणीची भीती वाटतं असेल?'
आता वडिलांचं हे उत्तर आलं आणि तिथूनच सुरू झाला निखतचा बॉक्सिंग खेळातील प्रवास. मग काय लहानपणापासून जिद्दी स्वभावाच्या निखतने या खेळात येण्याचा हट्ट केला. तिचे वडील हे एक रिअल इस्टेट एजंट. मग मुलीला याच खेळत आपलं करियर करायचं आहे म्हंटल्यावर काय त्यांनी त्यांचे लक्ष त्यांच्या कामापासून दूर केले आणि आपल्या मुलीला योग्य प्रशिक्षण मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर तिला भेटले ते म्हणजे हँडबॉल प्रशिक्षक अन्वर. त्यांनी निखतच्या खेळाबद्दल ओळखले आणि निखतणे याचं क्षेत्रात पुढे जावे असा सल्ला त्यांनी तिच्या वडिलांना दिला. त्यानंतर या खेळातील सर्व प्राथमिक प्रशिक्षण त्यांनीच तिला दिले.
यानंतर प्रशिक्षक शमशाम यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ती राज्यात चौथी आली. त्यानंतर राज्य पदक पटकावले. पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ती पंजाबला गेली, त्यावेळी 14 वर्षीय निखतने अंडर-18 मध्ये तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या बॉक्सरला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. 2010 मध्ये इरोड, तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनलमध्ये गोल्डन बेस्ट बॉक्सरचा किताब पटकावला. यानंतर तिचा खेळ पाहून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते IV राव यांनी त्यांना प्रशिक्षण दिले.
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षणापूर्वी निखतने हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले. इथे नेहमीप्रमाणे बॉक्सिंगसारख्या खेळात मुली नसत. अशा परिस्थितीत निखत मुलांसोबत प्रशिक्षण घेऊ लागली. यामध्ये तिला अनेक वेळा दुखापतही झाली. पण ध्येय डोळ्यासमोर होत आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तिच्या जिद्दीने तिला या अशा गोष्टींपासून कधीच रोखलं नाही. मुलींनी बॉक्सिंगसारख्या खेळातही यावे यासाठी तिला सर्वांसमोर एक आदर्श ठेवायचा आहे.
निखत जरीन ही मेरी कोम यांना तिचा आदर्श मानते. याआधी मेरी कोम ४८ किलो वजनी गटात खेळायची, पण आता ती ५१ किलो गटात खेळत आहे. अलीकडेच नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीत 36 वर्षीय मेरी कोमने 23 वर्षीय निखतसोबत लढण्यास नकार दिला होता. मेरीच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ असल्याने तिला चाचणी देण्याची गरज नाही. मात्र, याविरोधात निखत यांनी फेडरेशनला ईमेल लिहून तक्रार देखील केली होती. तर अशा प्रकारे तिने इतक्या मोठ्या खेळाडूसोबत सुद्धा पंगा घेतला होता. खरं हा जो प्रकार घडला त्यावेळी तिला अनेकांनी उद्धट आहे किंवा मोठ्या खेळाडूशी कसं वागायचं हे सुद्धा हिला समजलं नाही अशी टीका केली. पण तिने आपल्या हक्कासाठी मेरी कोमला सुद्धा सोडलं नाही..असे अनेक प्रसंग त्याच्या आयुष्यात घडले अशा या सगळ्या प्रसंगातून घडत गेलेल्या निखतणे काल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उचवली आहे.