लग्नाची शॉपिंग करा मुंबईतल्या या काही खास ठिकाणांवर!
X
सध्या सगळीकडेच जोरदार लगिन सराई सुरू आहे. लग्न म्हटलं की प्रत्येकाला टेंशन येतं ते लग्नाच्या खरेदीचं. आपल्या बजेट मध्ये लग्नाची खरेदी करण्याचं आवाहन प्रत्येक सामान्य कुटुंबाच असतं. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशी काही खास ठिकाणं सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये लग्नाची खरेदी करू शकता.
मंगलदास मार्केट
मुंबईतील मंगलदास मार्केट हे लग्नाच्या खरेदीसाठी अनेकांच्या पहिल्या पंसतीची जागा आहे. मंगलदास मार्केटमध्ये लग्नासाठी लागणाऱ्या विशेष रेशीम, लेस, ब्रोकेड आणि मखमली फॅब्रिक्सचे पोशाख आपल्याला माफक दरात मिळातात. इथून आपल्याला लग्नात उठून दिसता येईल अशा सुंदर पोशाख निवडण्यासाठी बरेच पर्याय मिळतात.
भुलेश्वर मार्केट
मंगलदास मार्केटपेक्षा भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्याला अधिक गर्दी पाहायला मिळेल. याचं कारण म्हणजे महिलासांठी लेहेंगा, साड्या, शूज, दागिने हे इथे अव्वल दर्जाचे मिळतात. त्याच बरोबर लग्नात लागणारी पूजेची थाळी देखील स्वस्त दरात विकणारी दुकाने इथे आहेत. इथल्या दुकांनामध्ये स्टिचर्ड फॅब्रिक प्रति मीटर २०० रूपयांपर्यंत मिळते तसेच इथे सुरेख अशा तयार दागिन्यांचीही विक्री होते.
झवेरी बाजार
भुलेश्वरपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं झवेरी बाजार हे मुंबईतलं सर्वात मोठं डायमंड मार्केट आहे. झवेरी बाजारात तुम्हाला छोट्या छोट्या दुकानांमधून चांगल्या प्रकारचे दागिने कमी दरात मिळू शकतात.
जुहू तारा रोड
आपल्याला जर लग्नाच्या खरेदीवर उदारपणे खर्च करायचा असेल तर हा आपण विलेपार्ले पश्चिमेला जुहू तारा रोडवर खरेदीसाठी जाऊ शकता.. रितु कुमार, फाल्गुनी आणि शेन मयूर, मसाबा, मनीष अरोरा अशा अनेक फॅशन डिझायनर्सचे स्टोअरर्स जुहू तारा रोडवर आहेत.या भागात किमया आणि अझा सारखे बुटीक देखील आहेत, जे डिझाइनर कपड्यांचे विषेश संग्रह विकतात.
नटराज मार्केट
मुंबई उपनगराच्या मालाड पश्चिम स्थानकाच्या शेजारी असलेलं नटराज मार्केट हे महिलांच्या लेहंगा, ड्रेस मटेरील, कॉस्मेटीक आणि एर्मोडरीच्या खरेदीसाठी विषेश ओळखलं जातं. कोणत्याही सणाला इथे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली असते.
हिंदमाता मार्केट
लग्नाचा ड्रेस, लेहेंगा, साड्या आणि दागदागिन्यांसाठी हिंदमाता मार्केट लग्नाची खरेदी करण्यासाठी लोकांची पहिल्या पसंतीची जागा आहे.आहे. हिंदमाता मार्केटमध्ये परवडणारी स्टँडअलोन फॅब्रिक स्टोअर्स, बुटीक आणि अनेक मोठे शोरूम आहेत ज्यात तुम्हाला बजेट मध्ये लग्नाच्या कपड्यांची खरेदी करता येते. लग्नाची साडी खरेदी करण्यासाठी हे सर्वात चांगलं मार्केट आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या किंमतीच्या आणि चांगल्या प्रतिच्या साड्या सहजपणे मिळतात.
क्रॉफर्ड मार्केट
जर तुम्ही रेडीमेड पूजेची थाळी, कळश, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रॉफर्ड मार्केट आणि त्याच्या शेजारची गल्ली, लोहार चाळ ही खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सर्व प्रकारच्या लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथली सक्सेस कॉर्नर आणि न्यू बॉम्बे बॅग कॉर्नर ही ठिकाणं लोकांच्या पसंतीची आहेत.