Home > पर्सनॅलिटी > सनस्क्रीन लावल्यावर चेहरा तेलकट आणि काळपट दिसतो? "या" टिप्स नक्की वापरा!

सनस्क्रीन लावल्यावर चेहरा तेलकट आणि काळपट दिसतो? "या" टिप्स नक्की वापरा!

सनस्क्रीन लावल्यावर चेहरा तेलकट आणि काळपट दिसतो? या टिप्स नक्की वापरा!
X

सन्सक्रीन वापरताना तुमचाही चेहरा तेलकट किंवा काळपट होतो का? यावर काही गोष्टी विचारात घेतल्यास तुम्हाला योग्य सन्सक्रीन निवडता येईल आणि तुमचा चेहरा खराब होणार नाही. चला तर मग, सन्सक्रीन खरेदी करताना आणि वापरताना कोणत्या टीप्स लक्षात घ्यायला हव्यात हे पाहुयात...

  • तुमच्या स्किन टाईपनुसार सन्सक्रीन निवडा
  • ऑइल स्किनसाठीसाठी ऑइल-फ्री आणि मॅटिफाइंग सन्सक्रीन वापरा. ह्या प्रकारात जास्त तेल नसते, त्यामुळे चेहरा चिकट होणार नाही. ड्राय स्किनसाठी हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग सन्सक्रीन निवडा. यामध्ये अलोवेरा, ग्लीसरीन, किंवा हायल्युरोनिक acid असतो जो स्किनला मऊ आणि हायड्रेट ठेवतो.
  • जर तुम्हाला घराबाहेर जाऊन थोडा वेळ बाहेर राहायचं असेल, तर SPF 30 पुरेसा असतो. जर तुमचं बाहेर जास्त वेळ जाणं होत असेल, तर SPF 50 किंवा त्यापेक्षा जास्त निवडा.
  • चेहऱ्यावर सन्सक्रीन जास्त प्रमाणात लावा. कमी प्रमाणात सन्सक्रीन लावल्यास ते पुरेसं संरक्षण देत नाही.
  • जर तुमचा चेहरा तेलकट होत असेल, तर पावडर सन्सक्रीन वापरा. यामुळे ओलावा कमी होतो आणि चेहरा ताजेतवाना दिसतो.
  • सन्सक्रीन 2-3 तासांनी पुन्हा लावावं, कारण त्याचा प्रभाव कमी होतो.

या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून, तुम्ही सन्सक्रीन वापरताना तेलकटपणा आणि काळपटपणाचा त्रास टाळू शकता.

Updated : 13 Dec 2024 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top