Home > पर्सनॅलिटी > 'कोविड वुमेन वारिअर्स द रियल हीरो' : आरती सिंह, मोक्षदा पाटील

'कोविड वुमेन वारिअर्स द रियल हीरो' : आरती सिंह, मोक्षदा पाटील

कोविड वुमेन वारिअर्स द रियल हीरो : आरती सिंह, मोक्षदा पाटील
X

आपल्या कर्तृत्वानं कायमच समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या अमरावतीच्या शहर पोलीस आयुक्त आरती सिंह आणि औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे 'कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ जानेवारी २०२१ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


लॉकडाउच्या काळात कोरोना संसर्गाची लाट आली, त्याची सर्वाधिक झळ नाशिक जिल्ह्यातील मालेगावालालागली होती. राज्यातील कोरोनाचा केंद्र म्हणून मालेगावकडे पाहिले जात होते. मात्र अशा संकटात नाशिक जिल्ह्याच्या तत्कालीन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी कठोर उपाययोजना करत आणि स्वतः फिल्डवर उतरत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याची नोंद घेत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने त्यांना 'कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो'हा पुरस्कार जाहीर केला.


औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही आरती सिंह यांच्याप्रमाणेच औरंगाबाद शहरात बाहेरुन येणाऱ्या लोकांकडून कोरोनाचा धोका लक्षात घेत, जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी नाकेबंदी करत स्वतः विविध भागात जाऊन कोरोनाला लगाम लावण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या याच कामाची दखल मोक्षदा पाटील यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने 'कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो'हा पुरस्कार जाहीर केला आहे.

Updated : 29 Jan 2021 4:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top