Home > पर्सनॅलिटी > लोकरीचे स्वेटर व ऊबदार कपडे चमकवण्यासाठी 'या' टिप्स नक्की वापरा

लोकरीचे स्वेटर व ऊबदार कपडे चमकवण्यासाठी 'या' टिप्स नक्की वापरा

लोकरीचे स्वेटर व ऊबदार कपडे चमकवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा
X

थंडीचे दिवस येताचं लोकरीचे स्वेटर व ऊबदार कपडे धुणे एक आव्हानचं आहे. कारण थंडीच्या दिवसात प्रत्येकाला लोकरीचे स्वेटर किंवा ऊबदार कपडे घालायला आवडतात आणि ते हिवाळ्यासाठी योग्य देखील असतात. पण, लोकरीचे कपडे स्वच्छ ठेवणे आणि त्यांचे सौंदर्य कायम राखणे हे कधी कधी कठीण काम होऊ शकते. कारण पाणी आणि साबण वापरण्यामुळे ते पटकन खराब होऊ शकतात. पण यावर घरगुती उपाय नक्कीच आहे. साधारणपणे, पाणी आणि साबण वापरणे हे लोकरीसाठी चांगले नसते, कारण यामुळे कपड्यांची बनावट आणि रंग दोन्ही खराब होऊ शकतात. पाणी आणि साबण न वापरता लोकरीचे स्वेटर व ऊबदार कपडे चमकवण्यासाठी एक विशेष ट्रिक आहे. जाणून घेऊयात

वाफ (Steam) द्या :

स्वेटर किंवा ऊबदार कपडे धुण्याआधी त्यांना चांगली वाफ द्या. वाफ कपड्यांच्या रेशिमाच्या फाइबर्समधून गंध आणि घाण बाहेर काढायला मदत करते. हे तुमचे कपडे धुण्याच्या प्रक्रियेपासून वाचवते आणि ते ताजेतवाने बनवते. थोड्याशा वेळासाठी कपड्यांना वाफ देण्यामुळे ते ताजेतवाने होतात आणि त्यांचा कुबट वास निघून जातो. वाफ दिल्यामुळे कपड्यांचा कडकपणाही निघतो आणि ते चांगले मऊ होतात. त्यांचे रंग चमकदार दिसतात आणि फॅब्रिक मऊ राहते.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर (Baking Soda & Vinegar) वापरा :

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून पाण्याच्या फवाऱ्याच्या बाटलीत भरून कपड्यांवर स्प्रे करा. हे दोन्ही घटक निसर्गिक शुद्धीकरण करणारे असतात. यामुळे कपड्यांतील घाण वास निघून जातो.

सूर्यप्रकाशात ठेवणे :

कपड्यांना सूर्यप्रकाशात व्यवस्थित वाळवून ठेवा. सूर्याच्या प्रकाशात विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे कपड्यांमधून कुबट वास निघून जातो. सूर्यप्रकाशात ठेवलेले कपडे ताजेतवाने व मुलायम होतात.

सिरका आणि लिंबू :

१ कप व्हिनेगर आणि १ चमचा लिंबाचा रस एका स्प्रिट्झ बाटलीत थोड्या पाण्यासोबत मिसळा. आणि कपड्यांवर स्प्रे खरा. नंतर कपड्यांना ५-१० मिनिटे ठेवून वाफ द्या. हे दोन्ही घटक निसर्गिक आणि सुलभ उपाय आहेत, जे कुबट वास घालवतात, तर त्याच वेळी कपड्यांचा मुलायमपणा व टिकावही कायम ठेवतात.

Updated : 18 Nov 2024 7:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top