Home > पर्सनॅलिटी > तरूणींनी राजकारणात येण्यासाठी आदर्श 'अदिती'

तरूणींनी राजकारणात येण्यासाठी आदर्श 'अदिती'

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या उद्योग, खाणकाम, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, आणि माहिती व जनसंपर्क या विभागाच्या राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचा वाढदिवस. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल!

तरूणींनी राजकारणात येण्यासाठी आदर्श अदिती
X

अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व नागरीपुरवठा मंत्री सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. अदिती तटकरे यांनी २००८-०९ मध्ये रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारणात एंट्री घेतली. तसचे २००९ साली सुनील तटकरे यांच्यासाठी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारात सक्रीय सहभागही घेतला.

अदिती यांनी २०१२ पासून राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. २०१७ साली रोहा तालुक्यातून रायगड जिल्हा परिषदेवर त्यांची निवड झाली आणि त्यांच्या अधिकृत राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूनही आल्या आणि त्यांना पक्षाने मंत्रीपदही दिलं.

अदिती या विधानसभेतील सर्वात तरुण महिला आमदार आणि मंत्री आहेत. अदिती यांनी एका मुलाखती दरम्यान 'वडील खासदार असल्यामुळे राजकारणात नेहमी घराणेशाहीचा दबाब असतो. मला वडीलांचा अभिमान आहे. मात्र मी जे काही मिळवलं आहे. ते लोकांच्या प्रेमामुळे आणि मी केलेल्या कामांमुळे आहे. घराणेशाहीचा दबाव हा आहे आणि तो असेलही, मात्र मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहाणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहाणार.'

अदिती यांची रायगड, रत्नागीरी आणि नवी मुंबई परिसरात प्रचंड लोकप्रियता आहे. अदिती घराणेशाहीचा आव न दाखवता तळागाळात जाऊन लोकांशी संवाद साधतात, तसेच जनतेच्या हितासाठी सतत झटत असतात. त्यामुळे त्या आम्हाला कायम जवळच्या वाटतात असे श्रीवर्धन तालुक्यातील अनेकांचे म्हणने आहे. अदिती यांनी मंत्री पदाची सुत्र हातात घेताच कामांचा धडाका लावला. अदिती या तरूण आणि तडफदार असल्यामुळे त्या राजकारणात येऊ इच्छीणाऱ्या असंख्य तरूणींसाठी आदर्श ठरत आहेत.

Updated : 16 March 2021 6:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top