"काळ्या पोरांना शिकायची गरज नाही"विद्यार्थ्यांनी यातून काय शिकायचं?
X
नुकतंच बजेट 2023 सादर झाले आहे .खरंतर या बजेटमध्ये सामान्यांसाठी काय ? असा मोठा प्रश्न तयार होत असताना देशातील शैक्षणिक प्रगतीच काय? हा सुद्धा मोठा प्रश्न तयार होत आहे .
जिथे मुलांना शाळा नाहीत, हातात पुस्तके नाहीत, शाळा शिकण्यासाठी घरात गरिबी असल्यामुळे पैसे नाहीत, अशा मुलांना शिक्षण म्हणजे काय ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही .अशीच एक घटना चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे.ही मुलं चक्क शिक्षकांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. त्यांना हे शिक्षकच नको आहेत. हे शिक्षक आम्हाला बदलून द्यावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे
शाळेत शिक्षक पुस्तकातील धड्याऐवजी भजने शिकवायला सुरू करतात ,असे या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मुलांच्या खेळाच्या तासावेळी शिक्षक स्वतः खुर्चीत बसून मोबाईल हातात बसतात .पण मुलांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा असून या शाळेत पाच शिक्षक आहेत .पण या शिक्षकांमध्ये एक महिला शिक्षिका सोडल्यास इतर शिक्षक हे अजिबात वेळेवर येत नाहीत .साडेदहा वाजता मुलं शाळेत असतात. पण शिक्षक मात्र अडीच वाजता शाळेला भेट देतात. अडीच ते शाळा सुटेपर्यंतच्या वेळेतही ते मोबाईल हातात घेऊन बसतात. पुस्तक हातात न घेता भजन म्हणायला सुरुवात करतात आणि मुलांना भजन म्हणायला लावतात.
मुलं काळी आहेत म्हणून त्यांना शिकवायला लागत नाही असे येथील एक महिला शिक्षिका या मुलांना म्हणते ,"काळ्या पोरांना शिकायची गरज नाही "हे या शिक्षिकेचे वाक्य खरंतर विचार करण्यास भाग पाडत आहे. या मुलांनी शाळेतून काय संस्कार घ्यायचे ? याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.