Home > News > ...आणि रामदेव बाबा हत्तीवरुन पडले

...आणि रामदेव बाबा हत्तीवरुन पडले

...आणि रामदेव बाबा हत्तीवरुन पडले
X

योगासनाच्या एका कार्यक्रमादरम्यान मथुरेत योगगुरू रामदेव बाबांना सोमवारी अपघात झाला. रामदेव बाबा हत्तीवर बसून योग करत होते. पण हत्तीने हालचाल करताच रामदेव बाबांचा बॅनल्स गेला आणि ते हत्तीच्या पाठीवरुन घसरले. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरसह अन्य सोशल साइटवर व्हायरल झाला.

ही घटना सोमवारी मथुरेतील महावनमधील आश्रमात घडली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेची खिल्ली उडवली जात आहे. रमणरेती आश्रमात वाळू असल्याने पडल्यावर त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते त्वरित उभे राहून हसू लागले.


Updated : 14 Oct 2020 1:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top