Home > News > यशोमती ताईंनी अनाथांच्या भविष्याची वाट सोपी केली नारायण इंगळे यांनी व्यक्त केलेल्या भावना

यशोमती ताईंनी अनाथांच्या भविष्याची वाट सोपी केली नारायण इंगळे यांनी व्यक्त केलेल्या भावना

यशोमती ताईंनी अनाथांच्या भविष्याची वाट सोपी केली नारायण इंगळे यांनी व्यक्त केलेल्या भावना
X

राज्यातील अनाथालय यांमध्ये राहून शिक्षण घेतलेल्या आणि भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनाथ तरुणांची करीयरची वाट आता सोपी झाली आहे. अनाथांसाठी एमपीएससी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण लागू करण्यासाठी यशोमती ताईंनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ माझ्या रूपाने समोर आल आहे. एमपीएससी परीक्षेतील अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळवणारा मी पहिला अधिकारी ठरलो आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. यासाठी यशोमती ताईंनी घेतलेले परिश्रम आणि विधिमंडळात केलेला पाठपुरावा तसंच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेली साथ मोलाची असल्याची प्रतिक्रिया नारायण इंगळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत वनक्षेत्रपाल म्हणून अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत नारायण इंगळे या तरुणाची नियुक्ती झाली आहे. अनाथ संवर्गातून आरक्षण मिळवणारा राज्यातील पहिला अधिकारी नारायण इंगळे ठरला आहे. याबाबत राज्य सरकार आणि महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यासाठी नारायण इंगळे यांनी आज ॲड.यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांच्याकडून आशीर्वादही घेतले अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ यापुढे तरुणांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संधीची दारे आता उघडली गेली असून त्यांच्यापुढे करिअरच्या दिशा मोकळ्या झाल्याची कृतज्ञ प्रतिक्रिया इंगळे यांनी व्यक्त केली आहे.


Updated : 1 Oct 2021 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top