जगातील सर्वात तरुण अब्जाधीश: १९ वर्षीय तरुणी कोण आहे ? भारताचा क्रमांक कितवा ?
X
फोर्ब्सने Forbes नुकतीच २०२४ सालची जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या यादीत १९ वर्षीय तरुणी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश असल्याचा अहवाल पुढे आला आहे. ही अब्जाधीश तरुणी एका कॉलेजची विद्यार्थिनी आसून ती मानसशस्त्र विषयात शिकत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही तरुणी भारताची तर नाही ना ? हा प्रश्न सर्वांच पडला आहे.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीतील ती 19 वर्षीय मुलगी दुसरी तसरी कोणी नसून ब्राझीलमधील बोरीटो येथे राहणारी लिव्हिया व्होइग्ट Livia Voigt आहे. ती सध्या एका कॉलेजमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण घेत आहे. लिव्हिया WEG नावाच्या लॅटिन अमेरिकेतील एका मोठ्या इलेक्ट्रिक मोटर उत्पादन कंपनीची सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक आहे. लिव्हियाकडे कंपनीचा ३.१ टक्के हिस्सा आहे, आणि तिच्याकडे कंपनीत कोणतेही उच्च पद नाही.
ज्या वयात बहुतेक लोकं खेळण्यात आणि मजा करण्यात व्यस्त असतात, त्या वयात लिव्हियाने जगातील सर्वात तरुण अब्जाधीशाचा मान मिळवला आहे. याआधी इटालियन तरुणी गिओवन्ना डेल वेचियो ही जगातील सर्वात तरुण अब्जाधीश होती, परंतु लिव्हियाने तिला मागे टाकले आहे.
लिव्हियाचा जन्म एका व्यावसायिक कुटुंबात झाला. तिचे वडील WEG कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. लिव्हिया आणि तिची मोठी बहीण डोरा या दोघींच्याकडे कंपनीत 3.1 टक्के हिस्सा असून डोराने 2020 मध्ये आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली आहे.
लिव्हियाकडे 1.1 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. तिची मोठी बहीण डोरा फोर्ब्सच्या 25 सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांचा मान दोन भावांना मिळाला आहे. फोर्ब्सच्या तरुण अब्जाधीशांच्या यादीत झिरोधाचे संस्थापक नितीन Nitin Kamat आणि निखिल कामत Nikhil Kamat अद्यापही भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत शीर्षस्थानी आहेत. त्यांच्यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल यांचा नंबर लागतो.
लिव्हिया व्होइग्टची यशोगाथा प्रेरणादायी आहे. लहान वयातच तिने अब्जावधी डॉलर्सची संपत्ती जमा केली आहे. तिच्या यशाबद्दल जगभरातून तिचं कौतुक होत आहे. तर तुम्हाला हा व्हीडीओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा