ब दर्जाच्या घरकुलासाठी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
गावातील गोरगरीब नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात यावे, या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील महिलांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जुलै पासून उपोषणास सुरवात केली आहे.
X
बुलडाणा// गावातील गोरगरीब नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात यावे, या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील महिलांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जुलै पासून उपोषणास सुरवात केली आहे.
गोरगरीब नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. परंतु घरकुलांच्या पपत्र ड मध्ये गावातील नोकरदार, सधन शेतकरी व ज्यांचे घरे सिमेंट काँक्रीटची आहेत, अशा लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरीत गोरगरीब लाभार्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
घरकुल मिळण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु एकाही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर गावातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना आवास योजनेसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत कधीही
बोलावण्यात आले नाही. घरकुल मिळण्यासाठी 21 व 22 मार्च रोजी मेहकर पंचायत समिती समोर उपोषण केले होते. त्यावेळी जॉब कार्ड देवून गावातील शोष खड्डे देण्याचे काम देण्यात आले होते. परंतु हे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य न वाटल्याने ते काम लाभार्थ्यांनी नाकारले. घरकुलांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छाया थोरात, केशरबाई मापारी, शोभा इंगळे, कमल खोकले, पुष्पा
निकस, कुशीवर्ता खोमले व कांता जाधव यांनी उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणचा सहा वा दिवस असुन प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला उपोषणकर्त्यांनी दिला आहे.