महिलांना विज्ञानात करिअर करण्यासाठी समान संधीची गरज
X
११ फेब्रुवारी रोजी, जगभरात आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस साजरा केला जातो. हा दिवस महिलांना विज्ञानाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे स्वागत करण्यासाठी समर्पित आहे.
२०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ११ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस म्हणून घोषितक केला असून, यूनेसको UNESCO आणि UN Women या संस्थांनी हा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. लैंगिक समानता आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
जगभरातील महिलांना विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे आणि विज्ञानातील महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकून त्यावर योग्य तो मार्ग काढणे हा आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवसाचा हेतु असल्याच समजल जात. महिलांनी विज्ञानात दिलेले योगदान समाजासमोर मांडून लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे ही आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवसाची वैशिष्ट्य आहेत.
२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस नवनिर्मिती, प्रदर्शन, उन्नयन, प्रगती, टिकवणे "IDEA: Innovate, Demonstrate, Elevate, Advance, Sustain" या थीम नुसार साजरा केला जाणार आहे.
विविध क्षेत्रातील संशोधकांमध्ये जगभरात महिला संशोधकांचे प्रमाण अजूनही कमी असून, महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी संशोधन निधी मिळतो. यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे.
महिला विविध क्षेत्रात पारंगत असून क्षेत्र कोणतेही असो त्या आपला ठसा उमटवत आहेत, म्हणून विज्ञानातील महिलांच्या योगदानाला मान्यता देणे आवश्यक आहे.
ज्या त्या राष्ट्रातील महिलांसाठी तेथील सरकारने महिलांना विज्ञानात करिअर करण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे सर्वांनी मिळून महिलांना विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
या दिवसाचे निमित्त आपण सर्वांनी महिला वैज्ञानिकांना त्यांच्या कार्यासाठी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन करूया.