उत्तर प्रदेशात मंदिरातील पुजाऱ्याने केला महिलेवर बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगात टाकली रॉड!
X
मंदिरातील पुजाऱ्यांना भारतीय संस्कृतीत अत्यंत आदराचं स्थान आहे. मात्र उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये चक्क मंदिराच्या एका पुजाऱ्याने आपल्या इतर दोन साथीदारांसह एका ५० वर्षीय अंगणवाडी सेविका असलेल्या महिलेर सामूहिक बलात्कार केला आहे. वैद्यकीय अहवालात तिच्या गुप्तांगात अनेक जखमा आढळून आल्या असून तिच्या बरगड्या तोडल्या आहेत, तसेच तिचा एक पायही मोडल्याचं समोर आलं आहे.
बदायूंमधील बलात्काराच्या या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. या फरार आरोपीला पकडण्यासाठी मदत करणाऱ्याला, २५ हजाराचं बक्षीस देण्याचं बदायूंचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी जाहीर केलं आहे. तसेच या घटनेतील आरोपींविरोधात कलम ३७६ डी आणि आयपीसी ३०२ अंतर्गत उघैती पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बदायूंमध्ये घडलेल्या या घटनेमुळे दिल्लीतील निर्भया, उत्तर प्रदेशातील कठुआ, उन्नाव, हाथरस, बलरामपूर अशा घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
सदरची घटना इतकी गंभीर आहे की पुजारी आणि त्याच्या साथी दारांनी मिळून तिच्यावर बलात्कार तर केलाच, पण ह्दय हादरवून सोडणारी बाब म्हणजे त्यांनी पीडीत महिलेच्या गुप्तांगात रॉड टाकल्यामुळे तिच्या गुप्तांगात बऱ्याच जखमा झाल्या आहेत. त्यांची वासना इतकी राक्षसी झाली होती, की या अत्याचारात पीडित महिलेचा पाय मोडला असून तिच्या सर्वांगात जखमा केल्या आहेत. इतक्या अत्याचारांनंतर अखेर पीडितेचा मृत्यू झाला असून, बालात्कार करणाऱ्या याच पुजाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
३ जानेवारी रोजी पीडित महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, ती बराच वेळ परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने सांगितल्याप्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले. महिलेचा मृतदेह मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार नोंदवून पोलीसांवर चौकशी साठी दबाव आणला.
भारताची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. मात्र याच राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा पुन्हा समोर येत आहे. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशातून बलात्काराच्या अत्यंत क्रूर घटना वारंवार समोर येत आहेत. एका मागे एक अशा अनेक घटना समोर येत असल्यानं उत्तर प्रदेशात कायदा फक्त नावाला उरलाय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.