स्त्री सशक्तिकरण : आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
X
कौटुंबिक मानसिक शारीरिक सामाजिक जागतिक आर्थिक या सर्व गोष्टींनी महिला परिपूर्ण असते त्याला आपण महिला सशक्तिकरण म्हणतो. महिला सशक्तीकरण म्हणजे महिलांना सशक्त बनवणे. कोणताही भेदभाव ना करता आर्थिक सामाजिक आणि व्यक्तिगत आधार देणे म्हणजे महिला सशक्तीकरण.महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे स्त्री हक्क कायदा त्यांना समजावून देणे. आणि त्यांना समाजात समान संधी प्रदान करणे. महिलांना कुटुंबापासून तर समाजापर्यंत सर्व ठिकाणी समान हक्क मिळणे म्हणजेच महिला सशक्तीकरण झाले असे म्हणता येईल.
आजही आपल्या देशात खेड्यापाड्यातील लोक स्त्री भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मुलगी म्हणजे ओझे वाटते त्यांना हे कळतच नाही की त्यांना जन्म देणारी हे जग दाखवणारी एक स्त्रीच आहे. अशा लोकांचे विचारच मागासलेले असतात. ते शिक्षणापासून वंचित असल्याने एक मुलगी शिक्षण घेऊन कुठल्या कुठे पोहोचू शकते आणि आईवडिलांचा मान सन्मान वाढवून सासरचे नाव रोशन करते. याची त्यांना जाणीव नसते. इथे प्रत्येकाला वाट्ते माझा मुलगा शिवाजी महाराज घडायला पाहिजे पण माता जिजाऊ नसेल तर शिवाजी घडविणार कोण. हे मागासलेली विचारधारा ठेवणार्या लोकाना कळतच नाही. प्रत्येक मुलाला आई पाहिजे बहीण पाहिजे बायको पाहिजे पण मुलगी नको आता मुलगी जन्मालाच आणली नाही तर आई बहीण बायको कुठून येणार.
नुसते मुलगा मुलगी एक समान देऊ त्यांना शिक्षण छान म्हणुन काही होत नाही. ते वाक्य प्रत्येक व्यक्तींमध्ये रुजले पाहिजे. स्त्री भ्रूणहत्या महापाप आहे. वंशाचा दिवा सर्वाना पाहिजे त्या वंशाच्या दिव्याला जगात आणणारी महिला मुलगी नको. हा किती मोठा मूर्खपणा आहे. असे मूर्ख लोक मानसिक विकृत असतात म्हणुनच त्यांच्या डोक्यात गर्भात असणार्या जिवाची हत्या करण्याचा विचार येतो. पण असे लोक कायद्यातून वाचू शकतं नाही. आणि खरोखरच देशातील कानाकोपर्यात मुलगा मुलगी एक समान समजले जाईल तेव्हा स्त्री सशक्तीकरण घडेल. स्त्री आणि पुरूष हे समाजाचे पूरक घटक आहेत. दोघांची भूमिका समान आहे.
दोघानाही समान वागणूक आणि संधी देणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. ही समानता केवळ कायद्यात ना राहता विचारात रुजली जाणे म्हणजे समानता. घरकाम मुलांचे संगोपन ही जबाबदारी फक्त स्त्रीचीच नसून दोघांचीही सारखीच असणे. पुरुषाला घरातील कर्ता मानतात आणि स्त्रीचे घरकाम अदृश्य मानतात ही मानसिकता बदलण्यासाठी दोघांनीही जबाबदार्या वाटून घ्यायला पाहीजे. स्त्री केवळ मुलगी आई बायको या भूमिकांच्या मर्यादेपर्यंतच नाही तर तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार असणे हे स्वातंत्र्य स्त्रीला असले तर ती व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करते.
घरकाम बालसंगोपन सगळे बाईने करायचे म्हणजे चोवीस तास तिने काम करायचे पण तिला वेतन नसते त्यामुळे प्रतिष्ठा नसते घराबाहेरच काम पुरुषाने करायचे त्याचे त्यांना पैसे मिळतात म्हणुन त्यांना प्रतिष्ठा असते त्यामुळे जे काही असते ते सर्व पुरुषांच्या मालकीचे त्यामुळे विवाहामध्ये पती पत्नीचे संबंध मालक नोकर असे असते त्यामुळे त्या स्त्रीने कधीतरी पतीच्या मनाविरुद्ध काही केले तर हा मालक तिला घराबाहेर काढतो तेव्हा त्या स्त्रीने काय करावे कारण तिच्याकडे पैसा नसतो आणि मग त्या स्त्रीचा संघर्ष चालू होतो.
अश्या परिस्थितीत स्त्री पुरुष समानतेची फार गरज असते पुरुष जरी पैसा कमावून आणतो तर स्त्रीपण संपूर्ण घर सांभाळते मग थोडे काही झाले की पैसे कमावणारा पुरुष स्त्रीला शिवीगाळ मारझोड घरातून बाहेर काढणे आणि तिच्या मानसन्मान आणि अब्रूची अवहेलना केली जाते. हे सगळे थांबविले पाहिजे. स्त्री पुरुष समानतेचे धडे अशा पुरुषप्रधान संस्कृतीला दिले पाहिजे. हेच खरे स्त्री सबलीकरण.
घराघरातील स्त्रियांचे संघर्ष थांबविणे त्यांना सक्षम करणे हेच स्त्री सशक्तिकरण.
महिलांना पण मन असते तिच्या सन्मानाची अवहेलना करून तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. त्यामुळे महिलांना ताणतणाव भित्रेपणा डिप्रेशन मानसिक संतुलन हरवणे यासारख्या समस्येला बळी पडावे लागते पुरुषांना काडीचाही फरक पडत नाही भोगावे स्त्रीलाच लागते. त्यामुळे तिची कार्यक्षमता कमी होते. स्त्रियांचे मानसिक सशक्तिकरण होणे फार गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने स्वताच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष्य दिले पाहिजे. यासाठी स्त्रियांनी निसर्गाशी मैत्री केली पाहिजे.
निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे छंद जोपासणे निरनिराळे उपक्रमांमध्ये सहभागी होणे स्वताचे मन नेहमी प्रसन्न ठेवणे चांगल्या विचारांची पुस्तके वाचणे नाचणे गाणे हे सगळे केले पाहिजे आणि स्वताचे मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. यासाठी कुटुंबानेही महिलांची साथ दिली पाहिजे. मानसिक खच्चीकरण ना करता ती मानसिक दृष्ट्या सक्षम कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
स्त्रियांचे शारीरिक आरोग्य सुदृढ आणि सशक्त असणे फार गरजेचे आहे. काही शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष ना करता वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. जीवनसत्त्व असलेला आहार घेणे. नियमित व्यायाम करणे. स्त्रियांना बाहेर जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागते. थोडक्यात आर्थिक जबाबदारी सांभाळून कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागते हे सर्व करत असताना ती स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते असे ना करता आधी स्वताच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्त्री सशक्त असेल तरच कुटुंबाचा विकास आणि प्रगती होईल. हे ध्यानात ठेवले पाहिजे.
आज महिलांनी उच्च शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांत प्रगती केली देश सांभाळण्यात त्या अग्रेसर आहे घर सांभाळण्यात त्या मोलाची कामगिरी बजावतात. तिला आत्मविश्वास आला आहे. तिला समजले की ती एक उत्कृष्ट निर्माती आहे. जेव्हा स्त्री सक्षम होईल तेव्हा ती आपोआपच सशक्त होईल. स्त्री जेव्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनते तेव्हा आपोआपच घरात आणि समाजात तिची ओळख बनते तिला मानाचे स्थान प्राप्त होते. आज सरकारने स्त्रियांना अनेक माध्यमे उपलब्ध करून दिली आहे. ज्या माध्यमामुळे स्त्री बाहेर जाऊन अर्थकारण करू शकते.
स्त्रीने स्वताचा हक्क समजून घेऊन त्यासाठी जागरुक असले पाहिजे. सरकारकडून महिलांना अनेक आर्थिक सुविधा दिल्या जातात त्याचा महिलांनी योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. आणि स्त्री सबलीकरण घडविले पाहिजे. हे सर्व स्त्रियांनी समजून सर्व सुविधांचा योग्य उपयोग करून स्वतःला सशक्त स्वावलंबी केले पाहिजे. तेव्हा स्त्री सशक्तिकरण मोहीम पूर्ण झाल्यासारखी होईल.
हे नारायणी,
तुम्हारी मुस्कान की वजह अब तुम खुद बन जाना,
ये संभालेगा वो कुछ करेगा उम्मीद मत किसी से मत लगाना,
साथ बनना ठीक है, पर कीसी का बोझ तुम मत बनना,
तुम्हारी मुस्कान की वजह अब तुम खुद बनना ।
-लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे