महिला कर्मचाऱ्यांनो घाबरू नका शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे - ADV. यशोमती ठाकूर
X
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांची आत्महत्या आणि महिला वनकर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि वरिष्ठांकडून होणारा जाच इ. तक्रारींची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि मेळघाटच्या पालकमंत्री adv. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विशाखा समितीचे कार्य योग्यरित्या चालवा
महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरित्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी. त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनधिकाऱ्यांना दिले. महिला वनकर्मचा-यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.