ती रस्त्याने जात असताना तिला थेट गाडीत खेचलं गेलं आणि तिच्यासोबत जे घडलं हे वाचून आपल्यालाही धक्का बसेल
X
महिला कुठेही सुरक्षित नाहीत. इंग्लंडमधील ब्रिस्टल शहरात एका महिलेचा सार्वजनिकपणे विनयभंग आणि मारहाण करण्यात आली. या घटनेत त्या महिलेचा दातही तुटला आहे. सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचे वर्णन करत पीडित महिलेने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
आधी अपशब्द बोलला आणि नंतर धक्काबुक्की केली
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, 21 वर्षीय तरुणी रीगन नाईट आऊटनंतर तिच्या मैत्रिणीसोबत घरी परतत होती, तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. या घटनेत एक मर्सिडीज चालवणारा माणूस तिच्या जवळ आला आणि त्याने अचानक तिला गाडीत ओढले. यानंतर त्याने रेगनला शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की केली.
लोक मदत करण्याऐवजी चक्क हसत राहिले
रेगनने सांगितले की तिला काही समजण्याआधीच त्या व्यक्तीने तिला आपल्या कारमध्ये ओढले आणि गलिच्छ बोलू लागला. त्यानंतर त्याने तिच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि तेथून पळ काढला. ही घटना घडली तेव्हा बरेच लोक रस्त्यावर उपस्थित होते, पण कोणीही रेगनला मदत केली नाही. पीडित तरुणी म्हणाली, 'मला कोणीही मदत करायला आले नाही. उलट शेजारी उभी असलेली काही मुलं हसून माझ्यावर कमेंट करू लागली.
जणूकाही माझ्यासोबत विनोद झाला
ब्रिस्टल विद्यापीठात इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या रेगनला तिच्या मैत्रिणीने रुग्णालयात नेले. तिचा मधला एक दात अर्धा तुटला आहे. रेगन म्हणाली, "माझ्यासोबत असे घडले यावर माझा विश्वास बसत नाही. हा केवळ माझा मुद्दा नसून सर्व महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे उभ्या असलेल्या इतर मुलांची प्रतिक्रिया होती. जणू काही माझ्यासोबत विनोद झाला आहे, अशी प्रतिक्रिया ते देत होते."
डॉक्टरांना दात काढावा लागला
रेगनचा पुढचा दात मध्यभागी तुटल्याने डॉक्टरांना तो दात काढावा लागला. रेगन म्हणाली, "या घटनेने माझा आत्मविश्वास नष्ट झाला आहे. त्या माणसाने माझा ड्रेस पकडला आणि मला त्याच्या कारमध्ये ओढले आणि मला धक्काबुक्की केली आणि माझे दात तोडले. शेवटी, हे कोणी कसे करू शकते? महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जावीत, जेणेकरून असा प्रकार पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी माझी इच्छा आहे."