राज्य महिला आयोग गुलाबराव पाटलांवर कारवाई करणार! – रूपाली चाकणकर
X
'रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन' असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या एका प्रचार सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी टीका करत आयोगातर्फे कारवाई करणार असल्याची माहिती व्हिडीओमार्फत दिली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना विरोधात लढाई लढत असून सध्या त्या ठिकाणी प्रचार सभांना चांगलाच जोर आला आहे.
या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या एका प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. आणि यावेळी त्यांनी 'तीस वर्षे आमदार असलेल्या लोकांना माझं आव्हान आहे. त्यांनी माझ्या मतदार संघात येऊन पहावं. धरणगावला हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर मी राजीनामा देईन.' असे वक्तव्य केलॆ.
त्यांच्या या वक्तव्यावर राज्य महिला आयेगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही एक व्हिडीओ प्रसिध्द करत राज्य महिला आयोग महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गुलाबराव पाटलांवर कारवाई करणार असल्याचं म्हणाल्या आहेत. " राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तूलना हेमा मालिनी यांच्या गालांशी करत फक्त त्यांचाच नाही तर समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. राज्य महिला आयोग त्यांच्याव योग्य ती कारवाई करेल." असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.