पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना "पंकजाताई आता महाविकास आघाडीच्या लेन्स मधून पाहिलं तर बरं होईल.." असं म्हणत महाविकास आघाडीत येण्याचं अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. आता पंकजा मुंडे हे निमंत्रण स्वीकारत राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे.
X
राजकीय कार्यक्रमात एकमेकांवर आरोप करणे काही नवीन नाही. अशा कार्यक्रमांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूचं असतात. पण ज्यावेळी एकमेकांवर आरोप करणारे हे एकाच स्टेजवर येतात त्यावेळी मग एकमेकांना काढलेले चिमटे देखील तितकेच रंजक असतात. असाच काही प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. एक कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर होते. आता हे दोघे एकत्र एकाच मंचावर आहेत म्हंटल्यावर राजकीय शेरेबाजी होणार हे नक्की होतं आणि ती झाली देखील. हे सगळं झालं पण ही शेरेबाजी करत असताना पंकजा मुंडे व धनंजय मुंडे जे म्हणाले त्यामुळे त्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार की काय? अशी चर्चा मुंबई पासून ते बीड पर्यंत रंगू लागली आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ ेत्रालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलताना मिश्कील पणे धनंजय मुंडे यांना टोला लगावत म्हंटल की, "मुंडे महाजनांच्या लेन्समधून स्वतःला मोठे करत पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे...पवार साहेबांच्या लेन्समधून बघण्याचे भाग्य खूप कमी लोकांना लाभले असे धनंजय मुंडे..माझ्या लेन्समधून बघत काम करणाऱ्या पण खूप मेरीट असणाऱ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते"
आता हे सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडे भाषणाला उभे राहिले आणि मग त्यांनी त्यांची शेरेबाजी सुरू केली. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंनी ज्या प्रकारे लेन्सची कोटी करत शेरेबाजी केली त्याच पद्धतीने त्यांनी त्यांना, "पंकजाताई आता महाविकास आघाडीच्या लेस मधून पाहिलं तर बरं होईल.." असं म्हणत महाविकास आघाडीत येण्याचं अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. या वेळी पुन्हा सभागृहात हशापिकला कारण धनंजय मुंडे म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि मी बसलो होतो त्यावेळी ते मला म्हणाले की, ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल..असं म्हंटल्या नंतर ते म्हणाले "असं ते म्हणत होते मी नाही" असा हा सर्व प्रकार झाल्यानंतर एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे या दोघांमध्ये कितीही राजकीय वाद असला किंवा ते दोघे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरीही बहिण-भावातला जिव्हाळा कायम आहे.