Home > News > कुटुंब कल्याणाची जबाबदारी महिलांचीच का? तीन वर्षांत फक्त 88 पुरुषांनी केली नसबंदी

कुटुंब कल्याणाची जबाबदारी महिलांचीच का? तीन वर्षांत फक्त 88 पुरुषांनी केली नसबंदी

कुटुंब कल्याणाची जबाबदारी महिलांचीच का? तीन वर्षांत फक्त 88 पुरुषांनी केली नसबंदी
X

आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा 130 कोटींवर गेला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 'कुटुंब कल्याण कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षांच्या काळातील आकडेवारीचा विचार केल्यास कुटुंब कल्याणासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांचाच पुढाकार अधिक असल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून 18 हजार 626 स्त्रियांनी शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेतला. यातुलनेत फक्त 88 पुरुषांनी नसबंदी केली आहे.

जिल्ह्यातील 1400 च्या वर गावांमधून कुटुंब कल्याणासाठी स्त्रियांसह पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आजही महिलांचेच प्रमाण अधिक असल्याचे मागील तीन वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते. अपत्य प्राप्तीपासून ते गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा कालावधी अन् पुढे बाळंतपणाच्या वेदना हे सर्व महिलेलाच सोसावे लागते. त्यानंतर किमान कुटुंब कल्याणासाठी पुरुषांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना त्यांचा वाटा कमी असणे ही शोकांतिका आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थींना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पद्धतीत व तात्पुरती पद्धती असे दोन प्रकार आहेत. कायमच्या पद्धतीमध्ये स्त्री शस्त्रक्रिया व पुरुष शस्त्रक्रियेचा समावेश आहे..राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य केंद्र, कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका आशा सेविका यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविली जाते. यामुळे काही अंशी बाल जन्मदराचे प्रमाणही आटोक्यात आल्याचे बोलले जात आहे.. कोरोना प्रादुर्भावामुळे या कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रियांमध्ये चांगलीच घट झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

शस्त्रक्रिया उद्दिष्ट, महिला (शस्त्रक्रिया), पुरुष (शस्त्रक्रिया) , लॅप्रोस्कोपी ,एकूण-

2019 - 2020

15192- 7718 - 40 - 980 - 8738 -57.52%

2020-2021- 15192 - 6352 -47 -1033 - 7432 - 48%

2021-2022- 15192 - 2444 -01 - 11 - 2456 -16.17%

June 2022 अखेर

15192 - 531 - 1 -0

ग्रामीण भागातील पात्र स्त्री पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी व ती निशुल्क असते तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय आशा सेविका ही पूर्ण पणे काळजी घेऊन करत असतात त्यामुळे स्त्री पुरुष यांनी पुढाकार घेऊन शस्त्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केले आहे..

Updated : 5 Aug 2022 6:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top