Home > News > "करियर सेट नाही झालंय आणि घरच्यांचा लग्नासाठी दबाव असतो आम्ही काय करायचं"

"करियर सेट नाही झालंय आणि घरच्यांचा लग्नासाठी दबाव असतो आम्ही काय करायचं"

करियर सेट नाही झालंय आणि घरच्यांचा लग्नासाठी दबाव असतो आम्ही काय करायचं
X

MPSC परिक्षा पुढे ढकलल्याने तरुणींनी व्यक्त केली चिंता

राज्य सरकार MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला आहे. पुण्यातून या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारच्या या भुमिकेवर आम्ही MPSC विद्यार्थीनींच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या त्या पुढील प्रमाणे.. "घरच्यांचा लग्नासाठी दबाव असतो, पण करीयर सेट नाही झालंय आणि त्यात या अशा परिक्षा पुढे गेल्या तर खुप मोठा प्रश्न आहे मुलींसाठी."

"जर आरोग्य विभागाच्या परिक्षा होवू शकतात तर मग MPSC च्या परिक्षा का नाही होऊ शकत. सरकारने जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घ्यावा पण परिक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे." अशा प्रतिक्रीया विद्यार्थीनींनी दिल्या आहेत.


Updated : 11 March 2021 7:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top