राज ठाकरेंना शिवसेनेचा इतका राग का? काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर पहा..
"सर्वच वक्तृत्वातून होत नाही त्याच्यासाठी संयम आणि नित्यनेमाने काम करावे लागते" किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल..
X
सध्या राज्याचे राजकारण हे भोंग्यांचा मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी भोंग्याचा मुद्द्यावरून थेट शिवसेनेला टार्गेट केले आहे. या सगळ्यामध्ये आगामी मुंबई महानगरपलीचेच्या निवडणूका डोळ्यासमोर आल्याने राज ठाकरे यांचा रोष हा शिवसेनेवर असल्याची चर्चा आहे.
या सगळ्या संदर्भात काल झालेल्या मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखतीत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचा शिवसेनेवर इतका राग का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, "त्यांना वाटत होतं की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना चालणार नाही. पण शिवसेना नुसती चालली नाही तर ती हजार पावलांनी पुढे नेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत टीका केली जाते. मात्र सर्वच वक्तृत्वातून होत नाही त्याच्यासाठी संयम आणि नित्यनेमाने काम करावे लागते असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे..