शीतलला का घेरलंय सगळ्यांनी? आमटे परिवाराला निखील वागळे यांचा सवाल
X
आनंदवनात गेल्या काही दिवसांपासून आमटे कुटुंबामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वAभूमीवर डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासह आमटे कुटुंबियांनी एक निवेदन जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या निवेदनात आमटे परिवाराने डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नाही तर डॉक्टर शीतल आमटे कर्जगी या सध्या नैराश्यात असून मानसिक ताणतणावात आहेत आणि याची कबुली त्यांनी स्वतः देखील दिलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे.
हे पत्र माध्यमांत प्रसिध्द झाल्यानंतर आता यावर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी "हे नेमकं चाललंय काय? कुटंबातली सत्तेची भांडण की आणखी काही? शीतलला का घेरलंय सगळ्यांनी?" असा सवाल आमटे परिवाराला केला आहे.
दरम्यान, डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये शीतल आमटे यांनी आनंदवन मधील कारभारावर आणि आमटे परिवारातील काही जणांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर आमटे कुटुंबीयांतर्फे हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.