Home > News > "भारतात मुस्लिम असणे गुन्हा" अमेरिकन संसदेत भारताची नाचक्की..

"भारतात मुस्लिम असणे गुन्हा" अमेरिकन संसदेत भारताची नाचक्की..

भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात मोठी मोहीम चालवली जात आहे. मोदी प्रशासन भारतात मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवत आहे.बिडेन प्रशासन मानवाधिकारांसाठी मोदी सरकारवर टीका करणे का टाळते? अमेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर यांनी अमेरिकन संसदेत उपस्थित केला प्रश्न..

भारतात मुस्लिम असणे गुन्हा अमेरिकन संसदेत भारताची नाचक्की..
X

अमेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर (Ilhan Omar) यांनी अमेरिका भारताला वारंवार देत आलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (joe biden) यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर यांनी बुधवारी अमेरिकेच्या संसदेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर यांच्यावर टीका करत मोदी सरकार अल्पसंख्याक विरोधी असून भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात मोठी मोहीम चालवली जात असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. ओमर यांनी एक ट्विट देखील केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बिडेन प्रशासन मानवाधिकारांसाठी मोदी सरकारवर टीका करणे का टाळते? असा प्रश्न त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केला आहे.

मोदी सरकारला पाठिंबा का?

ओमर यांनी बिडेन यांनी यावेळी बोलताना उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मनला यांनी अमेरिकन सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या सरकारलचे समर्थन कसे काय करत आहे प्रश्न केला त्यानंतर अमेरिकन काँग्रेसवुमनने देखील विविध देशांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला.

"भारत सरकारने मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवला आहे" उमर यांचा आरोप

उमर यांनी आरोप केला की, मोदी प्रशासन भारतात मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवत आहे. मोदी प्रशासन मुस्लीम अल्पसंख्याकांविरुद्ध करत असलेल्या कारवाईवर बाहेरून टीका करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

अमेरिकेनेही आपल्या लोकांवर होणारा अन्याय पाहिले पहावा..

अमेरिकेचे डेप्युटी स्टेट सेक्रेटरी शर्मन यांनी ओमरला समजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले "मी सहमत आहे की अमेरिकन प्रशासनाने जगातील प्रत्येक धर्म, वंश, विविधतेच्या गुणवत्तेसाठी उभे राहिले पाहिजे पण याचवेळी आपण आपल्याच मित्रपक्षांच्या वाईट गोष्टींविरुद्ध देखील बोलले पाहिजे त्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे.

Updated : 8 April 2022 9:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top