Home > News > Whatsapp : ठराविक व्यक्तीच्या Chat ला लावू शकता Password

Whatsapp : ठराविक व्यक्तीच्या Chat ला लावू शकता Password

Whatsapp : ठराविक व्यक्तीच्या Chat ला लावू शकता Password
X


Whatsapp ला आता एक नवीन फिचर आले आले. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचं चॅट लॉक करता येणार आहे. या आधी व्हाट्सअप ला पासवर्ड आपण टाकू शकत होतो किंवा एखाद्या व्यक्तीचे चॅट जर तुम्हाला कोणालाच दाखवायचं नसेल तर आपण त्याला archieve करू शकत होतो.

पण आता पुढे जाऊन ज्या व्यक्तीचे चॅट कोणाला दाखवायचं नसेल किंवा पर्सनल प्रायव्हेट ठेवायचे आहे अशा व्यक्तीच्या चॅटला तुम्ही लॉक करू शकता . त्यासाठी चॅट लॉक हा नवा ऑप्शन आला आहे . तुमच्या मोबाईलचा पासवर्ड टाकून तुम्ही त्या व्यक्तीचे चॅट सुरक्षित ठेवू शकता . त्याचे नोटिफिकेशन येणार नाही असं सुद्धा सेटिंग करता येऊ शकते .

त्यासाठी नक्की प्रक्रिया काय आहे?

१)playstore ला जाऊन whatsapp update करा .

२)ज्या व्यक्तीचे चॅट तुम्हाला lock करायचे आहे त्या व्यक्तीचे चॅट open करा

३)त्यांच्या नावावर click करा

४)scroll करा सर्वात शेवटी तुम्हाला chat lock हा पर्याय दिसेल

५)तिथून तुम्ही तुमचे चॅट lock करू शकता .

हे lock फक्त मोबाईल पुरतेच मर्यादीत

जर तुम्ही whatsapp web वरून device link करत असाल तर तिथे मात्र हे chat lock काम करणार नाही . त्यामुळे जरी तुमचा मोबाईल चुकून कोणी घेतला तर तुमचे चॅट सुरक्षितच राहतील.

ही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा ...

Updated : 29 Jun 2023 1:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top