Home > News > रिहाना आणि मियाच्या ट्विटनंतर काय चाललंय सोशल मिडियावर !

रिहाना आणि मियाच्या ट्विटनंतर काय चाललंय सोशल मिडियावर !

रिहाना आणि मियाच्या ट्विटनंतर काय चाललंय सोशल मिडियावर !
X

आंतराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर गेल्या २ महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल जगभरात घेतली जात आहे. २ फेब्रुवारीला रात्री रिहानाने ट्विटरवर शेतकरी आंदोलना संदर्भात एक बातमी शेअर करत त्यावर 'आपण यावर का बोलत नाही?' असा प्रश्न विचारला होता. रिहानाने ट्विट करताच अनेकांनी याबद्दल बोलायला सुरूवात केली. पॉर्न स्टार मिया खलिफा, अभिनेत्री अमांडा क्रेनी, स्विडनची पर्यावरण वादी कार्यकर्ती ग्रेटा थंनबर्ग यांनी पुढे येऊन या बद्दल ट्विट केले.

देशाबाहेरील या महिला कलाकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची दखल घेताच, २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंचारानंतर जे शेतकरी आंदोलन सोशल मिडियावर संपुष्टात यायला सुरूवात झाली होती, त्याला पुन्हा वादळी सुरूवात झाली आहे. रिहाना, मिया, अमांडा आणि ग्रेटा यांनी ट्विट करताच, शेतकरी आंदोलनावर ब्र ही न काढणाऱ्या भारतीय कलाकारांनी आणि भाजपच्या लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

शेतकरी आंदोलन ठरवून ग्लोबल केले?

शेतकरी आंदोलन जागतिक पातळीवर नेण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली काम करत असल्याचं शेतकरी आंदोलनचा विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं असून त्या संदर्भात एक डॉक्यूमेट व्हायरल करण्यात येत आहे. ज्यात रिहाना आणि इतर आंतराराष्ट्रीय कलाकारांना या आंदोलनावर ट्विट करण्याची वेळ ठरवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यात त्यांना यासाठी पैसे मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच हे करण्यासाठी रिहानाला तिच्या कथित प्रियकराने आणि कॅनेडीयन खासदाराने पैसे दिल्याचा दावा करण्यात येतोय.


मात्र अभिनेत्री अमांडा हिने याच संदर्भात केलेल्या एका ट्विटला कोट करत, 'थांबा?!? तुम्ही म्हणाताय रिहाना इतकी श्रीमंत नाही आणि तिला हे ट्विट करायचे पैसे मिळतात? तसं असेल तर मग मलाही पैसे मिळायला हवे होते. मला ही याबद्दल महित असायला हवं होतं. मलाही पैसे द्या आवडेल मला. विनंती आहे मलाही लगेचच पैसे पाठवा' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अमांडाने जे ट्विट कोट केलं होतं ते आता काढण्यात आलं आहे.









#IndiaTogether आणि #IndiaAgainstPropoganda ट्विटरवर ट्रेंडिंग!

रिहाना, मिया, अमांडा आणि ग्रेटा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट करताच, या सर्वांच्या विरोधात आणि कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तर #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropoganda म्हणत शेतकरी आंदोलनावर 'हा आमचा अंतर्गत वाद आहे, परराष्ट्रातील लोकांनी बोलू नये' असा फतवाच काढला आहे.

अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर, बॉलीवुडची क्वीन कंगना राणावत, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, बॅट मिंटन पटू सायना नेहवाल, क्रिकेटर प्रज्ञान ओझा यांच्यासह अनेकांवनी यावर ट्विट करत बाहेरच्या लोकांनी आमच्या देशातील अंतर्गत गोष्टींवर बोलू नये असं देशाबाहेरील कलाकारांना सुनावलं आहे. या बड्या कलाकारांसोबत शेतकरी कायद्याचं समर्थन करणाऱ्या भाजप समर्थकांनीही रिहाना, मिया, अमांडा आणि ग्रेटा यांना खालच्या पातळीवर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

कंगनाची भूमिका किळसवाणी?

बॉलीवुडची क्वीन कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलकांना थेट आतंकवादी म्हटलं आहे. तसेच रिहानाबद्दलही तिने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. एकीकडे देशाबाहेरून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत असताना दुसरीकडे या देशाचीच कलाकार असणारी कंगना आपल्याच शेतकरी आंदोलन कर्त्यांना खलिस्तानवादी समर्थक म्हणत त्यांची आतंकवाद्यांशी तुलना करत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे अनेक समर्थक कंगनाच्या या भूमिकेला किळस आणणारी भूमिका आहे असं म्हणत आहेत.

चारित्र्यावर उडवले जातायत शिंतोडे?

मिया खलिफा ही पॉर्न स्टार असल्याने शेतकरी आंदोलानाचा विरोध करणाऱ्या काही लोकांकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. त्यात एका पॉर्न स्टारने भारताच्या अंतर्गत गोष्टीत बोलू नये म्हणत, अनेक आक्षेपार्ह मीम, व्हिडिओ आणि मजकुर शेअर केला जात आहे. त्याचबरोबर रिहानालाही तिच्या वैयक्तीक आयुष्यातील संबंधांवरून ट्रोल करण्यात येत आहे. तसेच ती भारत विरोधी कारवाया करते असंही काही ट्विट्समध्ये म्हणण्यात आले आहे. पण मुळ मुद्दा असा की जर एखादी महिला शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहात असेल तर तिला तिच्या कामावरून तसंच तिच्या वैयक्तीक आयुष्यावरून खालच्या पातळीवर ट्रोल करणं कितपत योग्य आहे.

भारतीय पुरूषांची मानसिकता चुकलीये?.

रिहाना, मिया, अमांडा आणि ग्रेटा यांना शेतकरी आंदोलनाविषयी बोलू नये असं सांगताना त्यांच्या कामावरून आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केल्यामुळे भारतीय पुरूषांची मानसिकता उघडकीस आली आहे. भारतातील महिलांना ट्रोल करणाऱ्या या मंडळींनी देशाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराष्ट्रीय महिलांनी दिलेल्या समर्थानामुळे त्यांना थेट त्यांच्या व्यवसाय आणि वैयक्तीक आयुष्यवर आक्षेपार्ह मजकूर प्रदर्शित करून जगभरात भारतीय पुरूषांची प्रतिमा मलिन केली आहे, असं अनेक ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत.

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

अमेरिकेने एकीकडे या कृषी कायद्यांचं समर्थन केलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना इंटरनेटसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असंही मत अमेरिकेने नोंदवलं आहे. भारतीय बाजारपेठांची गुणवत्ता वाढवणाऱ्या सुधारणा आणि खासगी क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या बदलांचं अमेरिका स्वागत करत असल्याचंही अमेरिकन सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतामधील शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देताना शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कोणतंही विरोध प्रदर्शन हो लोकशाहीची ओळख असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच दोन पक्षांमधील मदतभेद हे चर्चेनेच सोडवले गेले पाहिजे असंही अमेरिकेने म्हटलं आहे.




Updated : 5 Feb 2021 11:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top